Take a fresh look at your lifestyle.

Post Office : या योजनेत रोज फक्त 50 रुपये भरा अन् मिळवा 35 लाख रुपये ; जाणून घ्या कसे ?

शेतीशिवार टीम, 26 डिसेंबर 2021 : पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक आणि चांगले रिटर्न्स. सुरक्षित आणि चांगल्या रिटर्न्ससाठी पोस्ट ऑफिस बचत योजनांना जास्त प्राधान्य दिल जातं.

पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित असण्याची हमी आहे. जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर शानदार रिटर्न्सच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल जाणून घ्या, जिथे तुम्ही पैसे गुंतवून मोठा फंड तयार करू शकता…

दरमहा जमा करा फक्त1500 रुपये :-

आपण जाणून घेणार आहोत, पोस्ट ऑफिसच्या ‘ग्राम सुरक्षा योजने’बद्दल. ही इंडिया पोस्ट सुरक्षा योजना कमी जोखमीच्या गुंतवणुकीचे उदाहरण आहे. जे तुम्हाला शानदार रिटर्न्स देऊ शकते. या योजनेत तुम्हाला दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच 50 रुपये प्रतिदिन. ही रक्कम तुम्ही नियमितपणे जमा केल्यास तुम्हाला भविष्यात तब्बल 31 ते 35 लाख रुपयांचा फायदा होईल.

गुंतवणुकीचे नियम जाणून घ्या :-

>> 19 ते 55 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खाते उघडू शकतो.
>> या योजनेची किमान विमा रक्कम रु. 10,000 ते रु. 10 लाखांपर्यंत आहे.
>> या योजनेचे प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक भरले जाऊ शकतात.
>> या योजनेत तुम्ही कर्जही घेऊ शकता.
>> या योजनेत सहभागी होऊन तीन वर्षानंतरही तुम्ही निवड रद्द (Optout) करू शकता. मात्र, या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही…

35 लाखांचा फायदा कसा होणार ?

समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल.

या योजनेअंतर्गत , पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.