Take a fresh look at your lifestyle.

UPSC Interview स्वातंत्र्याशी संबंधित विचारलेला हा प्रश्न, त्याचं उत्तर फक्त 2 चं उमेदवारांना देता आलं !

शेतीशिवार टीम : 8 ऑगस्ट 2022 :- दरवर्षी लाखो युवक युपीएससी परीक्षा (UPSC Exam) उत्तीर्ण होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. त्यातील काही उमेदवार प्री-मेन क्लिअर करून मुलाखतीपर्यंत पोहोचतात, पण UPSC इंटरव्हिव्हमध्ये विचारलेलया प्रश्नांवर त्यांचं डोकं गडबडून जातं आणि अनेकांना तेथून परत यावं लागतं, तर काहीजणचं अशा अवघड प्रश्नांची उत्तरे देतात तेच अधिकारी होतात. ही देशातील सर्वात मोठी परीक्षा आहे.

सध्या देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत UPSC मुलाखतीत देशाच्या स्वातंत्र्याशी संबंधित एक प्रश्न विचारला गेला, ज्याचे उत्तर देणं काहींसाठी तर कठीणचं असतं. फक्त 2 चं उमेदवारांनी हे उत्तर दिलं…

प्रश्न : स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात काय फरक आहे ?

1. स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी ध्वज दोरीच्या साहाय्याने खालून खेचून वर घेतला जातो. त्यानंतर तो उघडून फडकावला जातो. या प्रक्रियेला ध्वजारोहण (Flag Hoisting) म्हणतात. हे 15 ऑगस्ट 1947 च्या ऐतिहासिक क्षणी केलं होतं आणि तेव्हापासून दरवर्षी पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ध्वज फडकवतात.

तर प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजेच 26 जानेवारीला ध्वज शीर्षस्थानी बांधला जातो आणि तो उघडून फडकवला जातो. याला ध्वज फडकावणे (Flag Unfurling) म्हटलं जातं .

2. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताची राज्यघटना लागू झाली नव्हती आणि राष्ट्रपतींना घटनात्मक कार्यालयही नव्हते आणि कोणत्याही राष्ट्रपतींनी पदभार स्वीकारला नव्हता.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे एक दिवस आधी 14 ऑगस्टच्या संध्याकाळी राष्ट्रपती आपला संदेश देशाला देतात. त्याच वेळी, 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी घटनात्मक प्रमुख म्हणजेच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात…

3. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ध्वज फडकवला जातो. या दिवशी देश-विदेशातील लोक पंतप्रधानांना ऐकण्यासाठी पोहोचतात. तसेच प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण केलं जातं. येथे फ्लोट्स बाहेर काढले जातात. भारताचे शौर्य दाखवले आहे.