Take a fresh look at your lifestyle.

Dragon Fruit : सांगलीच्या युवा शेतकऱ्याचा सक्सेसफुल प्रयोग, पुणे मार्केटयार्डात प्रथमच ‘पिवळ्या ड्रॅगन’ची आवक, असा मिळाला दर..

पुण्याच्या गुलटेकडीमधील छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात प्रथमच पिवळ्या ड्रॅगन फळाची आवक झाली. आतापर्यंत बाजारात प्रामुख्याने लाल ड्रॅगनची आवक होत असते. यंदा प्रथमच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून पिवळे ड्रॅगन दाखल झाले आहे.

आंबट, खारट आणि चवीने थोडेसे गोड असलेल्या या फळाला इस्त्राईल ड्रॅगन फ्रूट असेही म्हटले जाते. जत तालुक्यातील उटगी गावातील उमेश लिगाडे या शेतकऱ्याचा 248 किलो माल रविवारी आडते रावसाहेब कुंजीर यांच्या गाळ्यावर आला. त्याला 38 हजार रुपये दर मिळाला.

लिगाडे यांनी सव्वा एकर क्षेत्रात पिवळ्या ड्रॅगनची लागवड केली आहे. त्यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा लाल ड्रॅगनची लागवड केली होती. त्यात विविध प्रयोग त्यांनी राबवले. तर, 2021 मध्ये पिवळ्या ड्रॅगनची दोन हजार रोपांची लागवड केली होती. त्याचे उत्पादन आता सुरू झाल आहे. लाल ड्रॅगनच्या तुलनेत पिवळ्या ड्रॅगनची टिकवण क्षमता अधिक आहे. या फळाचा गर पांढरा असतो. महाराष्ट्रात सांगलीसह केवळ सोलापूर येथील एका शेतकऱ्याने या फळाची लागवड केली आहे.

याबाबत आडते शरद कुंजीर म्हणाले, पिवळ्या ड्रॅगनला मार्केटयार्डात मोठ्याप्रमाणात ग्राहकांकडून मागणी आहे. शहरातील घरगुती ग्राहक, तसेच फळविक्रेत्यांनी खरेदी केली आहे. बाजारात प्रथमच पिवळे ड्रॅगन फळ दाखल झाले आहे. लाल ड्रॅगनच्या तुलनेत हे फळ अधिक चविष्ट असल्याने त्याला मागणी चांगली असून, दरही चांगला मिळाला आहे.

प्रथमच पिवळे ड्रॅगन हे बाजारात दाखल झाल्याने ग्राहक, शेतकरी, खरेदीदार आणि आइत्यांमध्ये विशेष कुतूहल आहे. या फळाला इतर फळांच्या तुलनेत चांगली मागणी आहे. अपेक्षित भावही मिळाला आहे. – शरद कुंजीर, आडते

ड्रॅगन फ्रुट शेतीला शासनाकडून मिळतंय 1 लाख 60 हजारांचं अनुदान.. 

इथे क्लिक करा

ड्रॅगन फ्रूटला पिटाहया किंवा स्ट्रॉबेरी पिअर असेही म्हणतात. त्याची चव रसाळ आणि गोड लागते. त्याचे अनोखे स्वरूप आणि प्रशंसित सुपरफूड शक्तींमुळे ते खाद्यपदार्थ आणि आरोग्याविषयी जागरूक लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. हे दक्षिण अमेरिकेचे फळ आहे. पण त्याचे गुणधर्म आणि फायदे लक्षात घेऊन आता ते जगभर घेतले जात आहे. हे सॅलड, जॅम, जेली आणि शेकच्या स्वरूपात सेवन केले जाऊ शकते.

ड्रॅगन फ्रुट हे फळ अनेक आजारांवर व त्वचेसाठी गुणकारी असून राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन घेत आहेत. अमेरिकतील वाळवंटातील या फळाची आता देशासह राज्यातील अनेक भागात शेती केली जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी जवळपास गेल्या 10 ते 15 वर्षांपासून ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. महाराष्ट्र सरकारनं ड्रॅगन फ्रुट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं आहे.

महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी हेक्टरी 1 लाख 60 हजारांचं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी अनुदान मिळवायचं असल्यास शेतकऱ्यांना MAHA DBT ऑनलाइन पोर्टलवर अर्ज दाखल करणं आवश्यक आहे.