शेतीशिवार टीम, 27 फेब्रुवारी 2022 : भारत सरकारच्या एमएसएमई (MSME) मंत्रालयाच्या सहकार्याने ग्राम उद्योग विकास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गावातील प्रगत कौशल्य कारागीर, बेरोजगार युवक आणि बचत गटांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून मदत दिली जाते. मुख्यमंत्री ग्रामोद्योग रोजगार योजना ऑनलाईन, खादी ग्रामोद्योग कर्ज….
ग्राम उद्योग विकास योजना 2022 :-
आधी खादी ग्रामोद्योग म्हणजे काय हे आपण समजून घेऊया…आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे कोणत्या ना कोणत्या कामात कुशल आहेत. कुशल कारागीर असूनही अनेक लोक बेरोजगार आहेत. अशा कुशल कारागिरांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून मदत म्हणून कर्ज दिलं जातं.
भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम, MSME मंत्रालयाकडून ग्रामीण भागातील अशा अनेक लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात मदत केली जाते. ग्रामउद्योग विकास योजनेअंतर्गत, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भारत सरकार, एमएसएमई (MSME) मंत्रालय आणि खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) द्वारे कर्ज/कर्ज दिले जातात.
सध्या केंद्र सरकारमध्ये सध्या सूक्ष्म लघु उद्योग मंत्री हे राज्यातील नारायण राणे आहेत त्यामुळे कुशल कारागिरांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कर्जत जामखेडचे आ. रोहितच्या पवार यांनीही मतदारसंघातील कुशल कामगारांना कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून भेट घेतली होती.
ग्राम उद्योग विकास योजना (GVY) : 2022 पात्रता :-
योजनेतील लक्ष्य लाभार्थी :
कुशल कामगार,
बेरोजगार तरुण
बचत गट (SHG)
ग्राम उद्योग विकास योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो ?
योजनेंतर्गत, कोणताही पारंपारिक कारागीर, कला आणि हस्तकलेतील कौशल्याचा अनुभव असलेली व्यक्ती अर्ज करू शकते…
खादी आणि ग्रामोद्योगद्वारे क्षेत्रांना मदत दिली जाते ?
खनिज आधारित उद्योगात – विद्युत शक्तीवर चालणारे कुंभाराचे चाक…
पॉलीमर आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये – चप्पल दुरुस्तीसाठी लेदर टूल किट
वन आधारित उद्योगात – मधमाश्यांच्या पेट्या..
कृषी आणि अन्न प्रक्रिया आधारित उद्योगांमध्ये :-
ग्राम तेल उद्योग पोर्टेबल कच्चा घाणी
बागकाम इ. नांगरणीसाठी लहान किट.
ग्रामीण अभियांत्रिकीमध्ये हाताने बनवलेले कागद, जग, पंतरवळ्या, ई. बनवण्यासाठी टूल किट देखील उपलब्ध करून दिल जातं.
मधमाशीपालन योजना अभियानांतर्गत KVIC द्वारे मधमाशांच्या पेट्या देखील वितरित केल्या जातात. (प्रत्येक लाभार्थीसाठी 10 मधमाशांच्या पेट्या)
संपर्क करा :-
अधिक माहितीसाठी कृपया www.champions.gov.in ला भेट द्या….
तर https://udyamregistration.gov.in/ या व्हेबसाइट तुम्ही रजिस्ट्रेशन करून अर्ज करू शकता…
तुम्ही Champions@gov.in ईमेल करू शकता.
या सर्व योजना आपण ‘शेती शिवार’ च्या माध्यमातून शेतकरी, पशुपालक, उद्योजक यापर्यंत पोचवण्याचं काम करतो. परंतु यातील कोणतीही योजना खोटी किंवा फेक नाहीये. तुम्हाला प्रत्येक योजनेच्या मुळापर्यंत गेल्याव्र्ह तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो.
तसेच नवनवीन योजनांसाठी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ‘ग्राम उद्योग विकास कार्यालय‘ ला भेट द्यावी.