Take a fresh look at your lifestyle.

Winter Health Tips : जेवल्यानंतर गुळाचा तुकडा चघळा ; ‘हे’ 8 फायदे वाचून आश्यर्यचकित व्हाल…

शेतीशिवार टीम,20 डिसेंबर 2021 :- पावसाळा संपत आला कि थंडीला सुरुवात होते. त्याचबरोबर वातावरणातील बदलामुळे काही आजारांचाही लोकांना या ऋतूत जास्त त्रास होत आहे. म्हणूनच बदललेल्या वातावरणानुसार आपल्या खाण्या-पिण्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही हिवाळ्यात तुमच्या आहारात गुळाचा वापर केला असेल तर ते तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

गुळामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी12, बी6, फोलेट, कॅल्शियम,आयर्न, फॉस्फरस आणि सेलेनियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. तसेच त्यात फॅट नसते. यामुळे गूळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतो.

शरीराला उबदार करते:-

हिवाळ्यात थंडीचा प्रभाव शरीरावर लवकर पडतो. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. तुम्हाला माहित आहे का? गुळाचा तापमानवाढीचा प्रभाव खूप जास्त असतो, त्यामुळे त्याच्या सेवनाने शरीरात उष्णता टिकून राहते.

रक्ताभिसरणात होण्यास मदत होते:- 

गुळाच्या सेवनाने शरीरात होणारे ब्लड सर्कुलेशन सुधारते. याशिवाय यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते.

सर्दीपासून आराम देते:-

हिवाळ्याच्या दिवसात सर्दी-खोकला होणे सामान्य गोष्ट आहे. गुळाच्या सेवनाने सर्दी-खोकल्यामध्ये आराम मिळतो.

पचनक्रिया चांगली राहते :-

गूळ हा असा पदार्थ आहे जो पचनक्रिया सुधारण्यासही खूप मदत करतो. बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या दूर करून पोट स्वच्छ ठेवण्यासाठीही गूळ खूप उपयुक्त आहे.

ऍनिमिया टाळण्यासाठी खूपच गुणकारी :

ऍनिमिया टाळण्यासाठीही गूळ खूप उपयुक्त आहे. वास्तविक गुळात आयर्न चे प्रमाण भरपूर असते. जे (red blood cells) लाल रक्तपेशींची सामान्य पातळी कायम ठेवते, ज्यामुळे शरीरात रक्त कमी होत नाही.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त :-

बर्याच वेळा हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी होतात, त्यामुळे वजन वाढू लागते. तसेच गूळ हे शरीरातील पोटॅशियम इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट करते . जे वजन कमी करण्यास मदत करते.

रोगप्रतिकारक शक्तीवर चांगला परिणाम होतो :-

गुळामध्ये अँटिऑक्सिडंट्स, झिंक आणि सेलेनियमसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सांधेदुखीपासून आराम :-

हिवाळ्यातही बऱ्याच लोकांची सांधेदुखी सुरू होते. गुळातील वेदनाशामक गुणधर्मांमुळे ते हाडे आणि सांधेदुखी दूर करण्याचे काम करते.