Take a fresh look at your lifestyle.

मुलेठी – अश्वगंधा गुळवेल पासून बनवलेला हर्बल चहा वाढवेल इम्यूनिटी, Omicron पासून रहाल दूर…

शेतीशिवार टीम, 26 डिसेंबर 2021 : ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुले आता तर प्रत्येकानेच आपला विचार केला आहे. लस घेतली असूनही, लोकांमध्ये नवीन व्हॅरिएंटचा धोका असतो. अशा परिस्थितीत, असे काय केले पाहिजे जे आपल्या शरीराचे या नवीन व्हॅरिएंटपासून संरक्षण मिळेल.

आयुर्वेदात अश्वगंधा, मुलेठी आणि गुळवेल हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुणकारी मानले जाते. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंटच्या धोक्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपण या आयुर्वेदिक पदार्थांचा वापर केला पाहिजे ज्या आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवतात.

कोरोनाच्या काळात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि आपल्या फॅमिलीची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेल,मुलेठी आणि अश्वगंधाचा चहा प्यावा.

अश्वगंधा, गुळवेल आणि मुलेठीचा चहा असा बनवा :-

साहित्य :-

1) अश्वगंधा पावडर.
2) 2इंच गुळवेलची स्टिक.
3) थोडसं मुलेठी पावडर.
4) चवीनुसार मध.

हर्बल चहा कसा बनवायचा :-

प्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी ठेवा उकळवा. आता त्यात 1 ते 2 अश्वगंधा रूट किंवा एक चमचा अश्वगंधा पावडर घाला. याशिवाय अर्धा चमचा मुलेठी पावडर आणि कुटलेल्या गुळवेल स्टिक्स घाला. त्यानंतर मंद आचेवर उकळू द्या. 5-10 मिनिटांनी गॅस बंद करून गाळून घ्या. चवीनुसार मध मिसळा आणि रोज सकाळी कोमट किंवा थंड प्या.

हा हर्बल चहा कसं काम करतो ?

अश्वगंधा:-

अश्वगंधा लहान-मोठ्या समस्यांवर उपचार करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच याच्या सेवनाने अनेक आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, लिव्हर टॉनिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल तसेच इतर अनेक पोषक घटक असतात जे तुमचे शरीर निरोगी ठेवतात आणि ताणतणाव कमी करतं. यासोबतच वजन कमी करणे,हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करणे, चांगली झोप घेणे इत्यादींमध्ये याचा फायदा होतो.

गुळवेल:-

गुळवेलामध्ये गिलोइन नावाचे ग्लुकोसाइड आणि टिनोस्पोरिन, पामेरिन आणि टिनोस्पोरिक ऍसिड असते. याशिवाय त्यात कॉपर,आयर्न , फॉस्फरस, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तसेच अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-कॅन्सर इत्यादी घटक आढळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच दमा(अस्थमा), सांधेदुखी, सर्दी, ताप, रक्तातील साखर, अशक्तपणा, खोकला यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

मुलेठी:-

औषधी गुणधर्मांनी समृद्ध,तसेच लिकोरिसमध्ये व्हिटॅमिन बी, ई तसेच फॉस्फरस, कॅल्शियम, कोलीन,आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सिलिकॉन, प्रोटीन, ग्लिसेरिक ऍसिडसह अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बायोटिक गुणधर्म असतात. जे शरीरातील कमजोरी दूर करते, कोरद खोकला, पोटदुखी, अशक्तपणा, पीरियड्स दरम्यान होणारा त्रास, मायग्रेनच्या समस्येपासून आराम देते.