Take a fresh look at your lifestyle.

नवं संकट ! Omicron आणि Delta ने बनवला नवा Delimcron व्हेरियंट ; जाणून घ्या, किती आहे धोकादायक ; काय आहेत लक्षणे ?

शेतीशिवार टीम, 25 डिसेंबर 2021 : युरोपियन देशांमध्ये ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरात Covid-19 च्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. वाढत्या रुग्णांमुळे अजून ओमिक्रॉनशी (Omicron) संबंधित माहिती स्पष्ट झालेली नसताना डेलमिक्रॉन (Delimcron) नावाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे (Delta variants)अडचणीत मोठी वाढ झाली आहेत.

तज्ञांचं म्हणणं आहे की, अमेरिका आणि युरोपमध्ये Covid-19 च्या धोकादायक लाटेसाठी डेलमिक्रॉन (Delimcron) नावाचा हा स्ट्रेनच जबाबदार आहे. अशा परिस्थितीत,असं म्हणता येईल की, हे समजणं फार कठीण नाही, Delmicron हा व्हेरियंट डेल्टा आणि Omicron ने बनलेला आहे. अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की, या दोन व्हेरियंटपैकी कोणता व्हेरियंट जास्त धोकादायक आहे ?

काय आहे हा डेल्मिक्रॉन (Delmicron) व्हेरियंट :-

डेल्मिक्रॉन हा अल्फा, बीटा आणि इतर सारख्या कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरियंट नसून हा डेल्टा (Delta) आणि ओमिक्रॉन (Omicron) या दोन व्हेरियंटचं कॉम्बिनेशन आहे. हे Covid-19 चा डबल व्हेरियंट आहे, ज्याने सध्या युरोपियन देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे.

डेल्टा व्हेरियंटने एप्रिल ते जून या काळात भारतात धुमाकूळ घातला घेतला होता. हा व्हेरियंट कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार होता, त्याने जगभरातील लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम केला.

डेल्टा व्हायरसच्या लक्षणांबद्दल जाणून घ्यायचं झालं तर, या व्हायरसच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांना तणाव, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि केस गळणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागले होते. तसेच डेल्टा व्हायरसच्या तुलनेत ओमिक्रॉनची (Omicron) लक्षणे अतिशय सौम्य दिसत आहे.

जरी हे अगदी सांसर्गिक असले तरी, यामुळे गंभीर लक्षणे उद्भवत नाहीत आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोकाही कमी आहे. ओमिक्रॉन (Omicron) संसर्गाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये घसा खवखवणे, डोकेदुखी आणि थकवा जाणवतो. ओमिक्रॉनच्या (Omicron) बाबतीत अन्नाची चव किंवा वास घेण्याच्या क्षमतेत काहीच परिणाम झालेला आढळून आला नाही.

डेल्मिक्रॉन (Delmicron) ची लक्षणे काय आहेत ?

डेल्मिक्रॉन (Delmicron) हे कोरोना व्हायरसच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटने बनलेलं आहे, म्हणून ते अधिक लवकर संक्रमित आणि गंभीर लक्षणांसह असल्याचं म्हटलं जातं. त्याबाबतीत संपूर्ण माहिती मिळण्यासाठी आता खूप संशोधनाची गरज आहे. लक्षणांबद्दल, डेल्मिक्रॉनमध्येही सारखेच लक्षणे आहेत कारण तो डेल्टा आणि ओमिक्रॉनचं कॉम्बिनेशन आहे.

सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या….

उच्च तापमान
सतत खोकला
तुमच्या गंध किंवा चवीमध्ये घट किंवा बदल
डोकेदुखी
वाहती सर्दी
घसा खवखवणे

या लोकांमध्ये Delmicron चा अधिक धोका :-

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, वृद्धत्व आणि कॉमोरबिडीटी असलेल्या लोकांमध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉनचा एकाचवेळी संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे.

याशिवाय,जगातील ज्या भागात लसीकरणाचे दर कमी आहेत, अशा लोकांनाही याचा धोका जास्त आहे. डेल्मिक्रॉन सारख्या गंभीर समस्येपासून बचाव करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस लोकांना लवकरात -लवकर आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांना बूस्टर डोस दोन्ही देणे अत्यंत आवश्यक आहे.

देशात Omicron व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. आत्तापर्यंत देशात या व्हेरियंटचे 350 हून अधिक रुग्ण आढळून आली असून, येत्या काही दिवसांत ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या गॅदरिंगमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.