Take a fresh look at your lifestyle.

हिवाळ्यात ‘हे’ 5 सुपरफूड रोज खा ; डोळ्याची दृष्टी इतकी वाढेल की, लागलेला चष्मा उतरवून ठेवाल…

शेतीशिवार टीम, 27 डिसेंबर 2022 : आजच्या काळात व्यस्थ जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मोठ्या संख्येने लोक डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. रात्रंदिवस कॉम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीनवर डोळे लावून राहिल्यानेही डोळ्यांवर परिणाम होतो. डोळे कोरडे होणे, लालसरपणा, मोतीबिंदू, डोळे झाल्याची भावना येणे यासारख्या समस्यांमुळे अनेकदा त्रास होतो.

सध्याच्या परिस्थिती लहान मुलांनाही चष्मा लागलाय. एकदा दृष्टी खराब झाली की ती पूर्ववत करता येत नाही. पण जर तुम्ही तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केला की ज्या नैसर्गिक पद्धतीने दृष्टीसाठी चांगली राहील तसेच तुमचा डोळ्यांचा चष्मा उतरू शकतो. एवढेच नाही तर पौष्टिक आहार नियमित घेतल्यास दृष्टी खराब होणार नाही. जाणून घेऊया हिवाळ्यात कोणते फळे डोळ्यांसाठी चांगले असतात.

चला तर मग जाणून घेऊया…

पालक :-

पालक मध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स चे भरपूर प्रमाण असतं जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात. पालकाचे कोणत्याही स्वरूपात सेवन केल्यास मोतीबिंदू टाळता येतो.

गाजराचा रस :-

हिवाळ्यात गाजर खूपच खाल्ले जाते. काहींना त्याचा हलवा खायला आवडतं तर काहींना सॅलडमध्ये गाजर खायला आवडते. पण गाजराचा रस डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे बीटा कॅरोटीन नावाचे घटक डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते. गाजराचा रस सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने दुप्पट फायदा मिळतो.

आवळा :-

आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. हे डोळे आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. आवळा खाल्ल्याने पेशी(सेल्स) मजबूत होतात. यासोबतच डोळ्याच्या आत असलेल्या रेटिना’ला ताकद मिळते.

रताळे :-

हिवाळ्यात भाजलेले किंवा उकडलेले रताळे खाण्यात एक वेगळाच आनंद असतो.हे तुमची डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत करते .रताळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास आणि डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करतं.

संत्री :-

व्हिटॅमिन-सी असलेले सर्वच फळे आरोग्यासाठी चांगली असतात. पण थंडीच्या ऋतूमध्ये संत्र्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात जे दृष्टी वाढवतात. याशिवाय, संत्रा व्हिटॅमिन-ए चा एक चांगला स्रोत आहे जो तुमच्या रेटिनासाठी फायदेशीर आहे.