Take a fresh look at your lifestyle.

अन्नप्रकिया उद्योगासाठी आता तात्काळ मिळतंय 50 लाखांचं अर्थसहाय्य ! शासनाकडून 148 प्रकल्पांना मंजुरी, पहा PDF फॉर्म अन् अर्ज प्रोसेस..

भारतामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग हा 5 व्या क्रमांकावरील मोठा उद्योग आहे. महाराष्ट्राची 65 टक्के लोकसंख्या कृषि व कृषि संलग्न क्षेत्राशी जोडलेली आहे. राज्यात प्रामुख्याने भात, ज्वारी, बाजरी, गहू, मका, नाचणी ही तृणधान्य पिके ; तूर, मूग, उडीद, हरभरा व इतर कडधान्य पिकांचे उत्पादन होते.

सोयाबीन, भुईमुग, सूर्यफूल, करडई, मोहरी ही प्रमुख तेलबीया पिके; मिरची, हळद, आले, धने इ. मसाला पिके आणि ऊस या नगदी पिकापासून गुळासारखी उत्पादने होत आहेत. महाराष्ट्र राज्य वेगवेगळ्या फळ उत्पादनामध्ये देशामध्ये आघाडीवर आहे, त्यामध्ये आंबा, काजू, केळी, संत्रा, द्राक्षे, डाळींब, पेरु, कलिंगड इत्यादी फळे आहेत. तसेच भाजीपाला पिकांमध्ये टॉमॅटो, बटाटा, भेंडी, वांगी व इतर पालेभाज्यांचे मोठया प्रमाणावर उत्पादन होते. आंबा, काजू, तृणधान्य, कडधान्य व तेलबियांवर मोठया प्रमाणावर अन्न प्रक्रिया होते. आंबा, केळी, द्राक्ष, पेरु, संत्रा, डाळींब, काजू, स्ट्रॉबेरी, टॉमेटो, ऊस यांचे मोठया प्रमाणावर होणारे उत्पादन ही राज्याची ओळख आहे.

महाराष्ट्र राज्य जरी निरनिराळी पिके, फळपिके यांचे उत्पादनामध्ये आघाडीवर असले तरी प्रक्रिया उदयोग, काढणीपश्चात पायाभूत सुविधा यांची कमतरता असल्याने मोठया प्रमाणावर होणारी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी दिनांक 20 जून, 2017 च्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना” लागू केली आहे .

या राज्यपुरस्कृत योजनेत प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्प किमतीच्या 30 टक्के अर्थसाह्य मिळते. जास्तीत जास्त शेतकरी, महिला व तरूण उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

अन्नधान्य प्रक्रिया, कडधान्य प्रक्रिया, फळ प्रक्रिया, भाजीपाला प्रक्रिया, बेकरी, बेदाणा निर्मिती, मसाले उत्पादने, राईस मिल, काजु प्रक्रिया, गुळ उत्पादन, तेलबिया प्रक्रिया आदी प्रकारच्या 645 कोटी रू. च्या 148 प्रकल्पांना राज्यस्तरीय बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांना प्रकल्प उभारणीनंतर प्रत्येकी पात्र प्रकल्प किमतीच्या 30 टक्के किंवा जास्तीत जास्त 50 लक्ष रू. अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

राज्यातील कृषि व अन्नप्रक्रिया उद्योगांचे उभारणीस चालना देऊन शेतकरी बांधवांना मूल्यवर्धनाद्वारे जास्तीचे उत्पन्न मिळून देण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रणिया योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी, महिला व तरुण उद्योजकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जाची PDF फाईल आणि शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे..

.जिल्हास्तरीय प्रकल्प अंमलबजावणी समितीने प्रस्तावाची करावयाची तपासणीसुची ( Annexure – I

1.विहित नमुन्यात लाभार्थ्याचा मुळ अर्ज

2. बँकचे कर्ज मंजुरी पत्र ( Term Loan ) व बँकेने केलेले मुल्यांकन ( Bank Appraisal ) .

3. 7/12, 8 अ (तीन महिन्याच्या आतील मुळप्रत) / भाडेकरारनामा

4. उद्योजकाचे आधार कार्ड व पॅनकार्ड / फर्मचे पॅनकार्ड

5. प्रकल्पाचा डीपीआर (DPR) व प्रक्रिया फ्लो चार्ट,

7. करारनामा

8. प्रकल्पासाठी लागणारी संयंत्रे (Plant & Machinary) साहित्याची पुरवठादाराकडील दरपत्रके ( Quatation)

9. इमारतीची ब्ल्यू प्रिंट. (Bank Attested) .

10. उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र.