IAS I-Q : भारत देशाला 7 नावांनी ओळखलं जातं ? तुम्हाला ती 7 नावं माहिती आहे का ?

0

शेतीशिवार टीम : 05 सप्टेंबर 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न – जगातील सर्वात उंच झाड कोणतं आणि ते कुठे आढळलं ?
उत्तर – कॅलिफोर्नियामधील रेडवुड (Redwood) नॅशनल पार्कमध्ये उभे असलेले कोस्ट रेडवुड हे जगातील सर्वात उंच जिवंत वृक्ष आहे, उंची 115.66 मीटर उंच म्हणजेच 379 फुटांचं हे झाड आहे. हे वृक्ष कुतुबमिनार पेक्षाही उंच आहे.

प्रश्न – कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा क्लीन बोल्ड होणाऱ्या खेळाडूचं नाव सांगा ?
उत्तर – राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये 52 वेळा, तर वनडेमध्ये 57 वेळा क्लीन बोल्ड झाला आहे.

प्रश्न – आंबट मध कोणत्या देशात आढळतो ?
उत्तर – ब्राझील

प्रश्न – असा कोणता देश आहे तिथे दरवर्षी राष्ट्रपती निवडला जातो ?
उत्तर – स्वित्झर्लंड (Switzerland) हा असा देश आहे जिथे दरवर्षी राष्ट्रपती निवडला जातो.

प्रश्न – आपल्या पृथ्वीचे वजन किती आहे ?
उत्तर – आपल्या पृथ्वीचे वजन, 5.972 × 10^24 किलो *13,170,000,000,000,000,000,000,000 पौंड*
(किंवा *5,974,000,000,000,000,000,000,000 Kilograms )* म्हणजे 5.9 ट्रिलियन ट्रिलियन (Trillion) Kilograms

प्रश्न – जर केळीच्या फळात बियाच आढळत नाही तर सांगा केळीचं झाड कसं उगवतं ?
उत्तर – वास्तविक केळीचे बीज हे फळात नसून ते मुळात असतं. प्रत्येक केळीच्या झाडाच्या मुळाशी किमान 4 ते 5 पाच निरोगी मोठ्या बिया असतात. म्हणजेच प्रत्येक रोप जेव्हा झाड बनतं. जेव्हा ते झाड बनतं तेव्हा ते 5 नवीन झाडांच्या बिया तयार करतं.

प्रश्न – जगातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा कुठं आहे ?
उत्तर – स्वित्झर्लंड (Switzerland) गॉटहार्ड बेस बोगदा, (Gotthard Base Tunnel) त्याची लांबी आज 57.09 km आहे. हा जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे.

प्रश्न – NCC ची सुरुवात कधी झाली ?
उत्तर – NCC (National Cadet Corps) ची सुरुवात 15 जुलै 1948 रोजी नॅशनल कॅडेट कॉर्प्स अँक्ट अंतर्गत झाली. त्याला युनिव्हर्सिटी ऑफ ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्स (UOTC) चा उत्तराधिकारी मानण्यात आलं.

प्रश्‍न – 10 रुपयांत असं काय खरेदी कराल ज्याने संपूर्ण घर भरलं पाहिजे ?
उत्तर – कँडिडेट्स चं उत्तर – मी 10 रुपयांना अगरबत्ती किंवा मेणबत्त्या विकत घेईन, ज्यामुळे संपूर्ण घर त्याच्या प्रकाशाने आणि सुगंधाने भरून जाईल…

प्रश्न – असं काय आहे जे जळत नाही अन् पाण्यात बुडतही नाही ?
उत्तर – बर्फ

प्रश्न – भारत देशाला 7 नावांनी ओळखलं जातं ? तुम्हाला ती 7 नावं माहिती आहे का ?
उत्तर – भारत – इंडिया, भारत, हिंदुस्थान, आर्या-वर्त, जंबुद्वीप, भरतखंड, हिंद, नॉस्ट्राडेमसने (Nostradamus) भारताला अँटलस नावानेही संबोधलं आहे.

प्रश्न – भारतात शून्य रुपयाची नोट कधी आणि का छापली गेली ?

उत्तर – RBI ने कधीही शून्य रुपयांच्या नोटा छापल्या नाहीत. परंतु, 2007 मध्ये 5th pillar नावाच्या NGO ने शून्य रुपयांच्या नोटा छापण्याचे काम सुरू केलं. ही NGO तामिळनाडूची आहे. ज्यांनी लाखो रुपयांच्या शून्य नोटा छापल्या. या नोटा हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम सारख्या इतर भाषांमध्येही छापण्यात आल्या होत्या.

NGO ने लाच घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून या नोटा छापल्या होत्या. NGO ने लाचखोरीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना त्यांचे हक्क आणि पर्यायी उपायांची आठवण करून देण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि बाजारपेठेत शून्य रुपयांच्या नोटा वितरित केल्या होत्या.

भ्रष्टाचाराच्या विरोधात बनवलेल्या या चिठ्ठीत अनेक संदेश लिहिले होते, त्यात ‘भ्रष्टाचार संपवा’, ‘कोणी लाच मागितली तर ही नोट द्या आणि प्रकरण आम्हाला सांगा’, ‘मी लाच घेणार नाही याची शपथ घेतो.’ असे अनेक संदेश लिहिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.