IAS I-Q : स्वतंत्र भारतातल्या एकमेव महिला मंत्री कोण होत्या, त्यांच्याकडे कोणतं खातं देण्यात आलं होतं ?

0

शेतीशिवार टीम : 13 सप्टेंबर 2022 : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 15 सदस्यीय मंत्रिमंडळाची स्थापना केली. या मंत्रिमंडळात सर्व वर्ग आणि समाजाला योग्य स्थान देण्यात आलं होतं, अगदी विचारसरणीच्या पातळीवर जवाहरलाल नेहरूंच्या विरोधात असलेल्यांनाही…

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिले पंतप्रधान आणि व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी पहिले गव्हर्नर जनरल म्हणून पदभार स्वीकारला. 15 ऑगस्ट 1947 पासून कामकाज सुरू झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळात चौदा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला.

प्रश्न 1 :- स्वतंत्र भारतातल्या एकमेव महिला मंत्री कोण होत्या, त्यांच्याकडे कोणतं खातं देण्यात आलं होतं ?

उत्तर :- त्यामध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून राजकुमारी अमृत कौर अहलुवालिया या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री आणि एकमेव महिला मंत्री होत्या. (2 फेब्रुवारी 1889 – 2 ऑक्टोबर 1964) – (हा प्रश्न UPSC नागरी सेवा परीक्षा : 2021 इंटरव्हिव्ह मध्ये विचारण्यात आला होता) 

देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होता आणि त्यांच्याकडे कोणते मंत्रालय होते, जाणून घ्या ?

पंडित जवाहरलाल नेहरू :- पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, राष्ट्रकुल संबंध मंत्रालय आणि वैज्ञानिक संशोधन मंत्रालय
सरदार वल्लभभाई पटेल :- उप – पंतप्रधान, गृह मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण
आर.के संमुखम शेट्टी :- अर्थ मंत्रालय

डॉ. भीमराव आंबेडकर :- कायदा मंत्रालय
सरदार बलदेव सिंग :- संरक्षण मंत्रालय
डॉ. जॉन मथाई :- रेल्वे आणि वाहतूक मंत्रालय

मौलाना अबुल कलाम आझाद :- शिक्षण मंत्रालय
सी.एच भाभा :- वाणिज्य मंत्रालय
डॉ. राजेंद्र प्रसाद :- अन्न आणि कृषी मंत्रालय

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी :- उद्योग आणि पुरवठा मंत्रालय
बाबू जगजीवन राम : कामगार मंत्रालय
राजकुमारी अमृत कौर : आरोग्य मंत्रालय

रफी अहमद किडवाई : दळणवळण मंत्रालय
नरहर विष्णू गाडगीळ : बांधकाम, खाण आणि ऊर्जा मंत्रालय
के.सी. नियोगी : मदत आणि पुनर्वसन मंत्रालय

प्रश्न 2 : – 2021 नुसार, भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे ?

उत्तर :- गोंड जमात (Gond Tribe) भारतातील सर्वात मोठी जमात आहे. 12 दशलक्षा हून अधिक लोकसंख्या असलेला गोंड हा भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सर्वात जुनी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेली जमात गोंड आहे.

प्रश्न : 3 :- आशिया खंडातील सर्वात मोठी जमात कोणती आहे ?

उत्तर :- लोकसंख्येच्या दृष्टीने भिल्ल ही भारतातील सर्वात मोठी जमात आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील भिल्ल जमातीची लोकसंख्या 1 कोटी 69 लाख आहे. ज्यामध्ये 86 लाख पुरुष आणि 84 लाख महिलांचा समावेश होता.

प्रश्न : 4 :- भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कोण होते ?

उत्तर :- भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी आयझेनहॉवर होते, जे 10 डिसेंबर 1959 रोजी भारतात आले होते. जवाहरलाल नेहरू त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते.

प्रश्न : 5 :- संविधानाचा नेमका काय आहे अर्थ ?

उत्तर :- संविधान म्हणजे राष्ट्र, राज्य किंवा संस्था चालवण्यासाठी बनवलेले नियम आणि कायदे. संविधान हा एक प्रकारचा वैध दस्तऐवज आहे, ज्यामध्ये नियम आणि कायदे नमूद केले आहेत. हे नियम आणि कायदे कोणताही देश, राष्ट्र किंवा संस्था पद्धतशीरपणे चालवण्यासाठी बनवले जातात…

प्रश्न : 6 :- भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

उत्तर :- क्षितिश चंद्र नियोगी (1888–1970)

प्रश्न : 7 :- भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी किती वेळ लागला होता ?

उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारताची राज्यघटना तयार होण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते पूर्ण झालं, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय प्रजासत्ताकची ही राज्यघटना लागू झाली. संविधानाची मूळ प्रत ‘प्रेमबिहारी नारायण रायजादा’ यांनी लिहिली होती. संविधानाच्या मूळ प्रती हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये लिहिल्या गेल्या.

प्रश्न : 8 :- भारताच्या संविधान सभेत एकमेव मुस्लिम महिला कोण होती ?

उत्तर :- बेगम एजाज रसूल या संविधान सभेच्या सदस्यांपैकी एकमेव मुस्लिम महिला होत्या. त्यांचा जन्म 2 एप्रिल 1909 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव बेगम कादसिया एजाज रसूल होते. त्या मुस्लिम लीगच्या सदस्य होत्या, नंतर मुस्लिम लीग विसर्जित झाल्यावर त्या काँग्रेसमध्ये सामील झाल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.