ATM मधून रंग लागलेली खराब नोट बाहेर आली तर, पटकन ‘हे’ एक काम करा, नोटा बदलून मिळतील !

0

शेतीशिवार टीम, 19 जुलै 2021 :-आता तो काळ संपला आहे, जेव्हा लोक 2-4 हजार रुपये जरी काढायचे असले तरी बँकेत जात असत. परंतु सध्याचा काळ हा एटीएमचा (ATM) आहे. काही सेकंदात तुम्ही एटीएममधून अनेक हजार रुपये काढू शकता. एटीएममधून पैसे काढणे सोपे आणि सोयीस्कर आहे. परंतु एटीएममधून फाटलेल्या नोटा आल्या तर काय? किंवा एटीएममधून एखादी खराब नोट बाहेर आली असेल असेही होऊ शकते.

अश्या परिस्थितीत लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कारण कोणी फाटलेल्या किंवा खराब नोटांना स्वीकारत नाही. जर तुमच्या बाबतीत असे कधी झाले तर टेन्शन घेऊ नका, कारण आरबीआयने याबाबत नियम बनवले आहेत. तूम्ही त्या नोटा सहजपणे बदलून त्या जागी नवीन नोटा घेऊ शकता. यासाठी खूप मोठी प्रक्रिया नाही, त्यासाठी एक छोटी प्रक्रिया आहे, त्याचे अनुसरण करावे लागेल आणि तुम्हाला अगदी सहजपणे त्याबदल्यात नवीन नोटा दिलया जातील.

जाणून घ्या अश्या परिस्थितीत काय करावे :-
काही काळापूर्वी, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या ग्राहकाला अशाच एका एटीएममधून 500 रुपयांची खराब नोट मिळाली होती. त्या ग्राहकाने ट्विटरवर याबद्दल तक्रार केली. एसबीआयने या प्रकरणाची दखल घेतली आणि या नोटांविषयी माहिती दिली. परंतु एसबीआयच्या मते अशा एटीएममधून अशा खराब नोटा येणार नाहीत. परंतु एटीएममधून खराब नोटांच्या तक्रारी अगदी सामान्य आहेत.

कुठे बदलाव्यात अश्या नोटा? :-
ज्या ग्राहकांनी एसबीआयकडे खराब नोटांबद्दल तक्रार केली होती त्यांचा संदर्भ घेऊन एसबीआयने स्पष्टीकरण दिले की एटीएममध्ये पैसे टाकण्यापूर्वी अशा नोटा मशीनद्वारे तपासल्या जातात. परंतु त्याच वेळी असेही सांगण्यात आले की तुम्ही एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन त्या नोटा सहज बदलू शकता. जर तुमच्यावर कधी असा प्रसंग आला तर काळजी करू नका तुम्हाला एटीएममधून कोणतीही खराब नोट मिळाल्यास प्रथम तुम्ही ज्या बँकेच्या एटीएममधून ही नोट काढली आहे त्या बँकेशी संपर्क साधावा.

या आहेत आरबीआयच्या सूचना :-
RBI च्या नियमांनुसार, तुम्हाला एटीएममधून मिळालेली फाटलेली नोट तुम्ही थेट बँकेत घेऊन जा आणि बँकेच्या कर्मचार्‍यांना सांगा की ही नोट तुमच्या एटीएममधून मिळाली आहे आणि तुम्ही ती बदलून देऊ शकता का? यावर जर बँक तुमची नोट घेत नसेल तर तुम्ही इतर पद्धती देखील अवलंबू शकता. रिझर्व्ह बँकेच्या एक्सचेंज करन्सी नियम 2017 नुसार जर तुम्हाला एटीएममधून फाटलेली नोट मिळाली असेल तर ती नोट बदलून देणे ही बँकेची जबाबदारी आहे. यामध्ये जास्त वेळ लागत नाही.

2017 मध्ये सर्कुलर जारी करण्यात आले होते :-
आरबीआयने सन 2017 मध्ये एक परिपत्रक जारी केले होते. कोणत्या नोटा बँका स्वीकारू शकतात आणि कोणत्या स्वीकारू शकत नाहीत याविषयी ते परिपत्रक होते. परिपत्रकानुसार, कोणत्याही नोटांवर जर राजनीतिक स्लोगन लिहिले असेल तर ती नोट अस्वीकार्य असेल. कोणतीही बँक ती स्वीकारणार नाही. अशा नोटा लीगल टेंडर राहणार नाहीत, असे आरबीआयने आपल्या परिपत्रकात स्पष्टपणे सांगितले आहे.

कोणत्या नोटा बदलल्या जाणार नाहीत? :-
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार वाईटरित्या जाळल्या गेलेल्या, कुजलेल्या स्थितीत असलेल्या नोटा बदलून घेता येणार नाहीत. जर बँकेच्या अधिकाऱ्याला असे समजले की तुम्ही मुद्दाम नोट फाडली आहे किंवा कापली आहे तर तो अधिकारी तुमच्या नोटा बदलून देणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.