वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या बहुप्रतिक्षित इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. इंदूर ते मनमाड दरम्यान 268 किलोमीटर लांबीची लाईन टाकण्यात येणार आहे. या ट्रॅकच्या उभारणीमुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सहा जिल्हे म्हणजेच इंदूर, धार, खरगोन, बारवानी, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांना फायदा होणार आहे. (मनमाड – इंदूर रेल्वे प्रोेजेक्ट)
या रेल्वे मार्गाचा डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून मध्य रेल्वेनेही रेल्वे बोर्डात तो अहवाल मांडला आहे. या अहवालानुसार 10 हजार कोटींच्या या प्रकल्पाची किंमत आता 22 हजार कोटींवर पोहचली आहे.
इंदूर – मनमाड रेल्वे मार्ग एकूण 268 कि.मी. लांबीचा असणार आहे. या रेल्वेमार्गामुळे धुळे ते नोएडा हे अंतर 50 किलोमीटरने कमी होणार आहे. धुळे – मनमाडदरम्यान 50 कि.मी.चे काम सुरू आहे. उर्वरित 218 कि.मी.साठी 2200 हेक्टर जमीन लागणार आहे.
बहुप्रतिक्षित इंदूर – मनमाड रेल्वे मार्ग जमिनीवर आणण्याच्या दिशेने काम आता वेगाने सुरू आहे. खासदार शंकर ललवाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून मध्य रेल्वेने तो रेल्वे बोर्डाला सादर केला आहे.या ट्रॅकच्या उभारणीमुळे इंदूरच नव्हे तर निमार भागालाही फायदा होणार आहे.
इंदूर ते मुंबई आणि दक्षिणेकडील राज्यांमधील संपर्क सुलभ होईल. इंदूर ते मुंबईचे अंतर आणखी कमी होईल. आता रेल्वे बोर्ड या अहवालाची तपासणी करेल आणि अहवाल NITI आयोगाकडे पाठवेल, त्यानंतर NITI आयोग त्याचा अभ्यास करेल आणि हा अहवाल अर्थ मंत्रालयाकडे जाईल. शेवटी केंद्रीय मंत्रिमंडळ त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करेल…
कसा आहे इंदूर – मनमाड रेल्वे प्रोजेक्ट..
इंदूर – मनमाड रेल्वे मार्ग एकूण 268 किमी लांबीचा असेल, त्यापैकी धुळे ते मनमाड दरम्यान 50 किमीचे काम सुरू आहे.
उर्वरित 218 किमीसाठी 2,200 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून या मार्गावर 300 छोटे – मोठे पूल बांधण्यात येणार आहेत..
9 बोगद्यांचा हा रूट असून ज्याची लांबी 20 किलोमीटरपेक्षा जास्त असेल..
या मार्गावर 34 स्टेशन्स बांधण्यात येणार आहेत. या ट्रॅकच्या बांधकामामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील इंदूर, धार, खरगोन, बारवानी, धुळे आणि नाशिक या सहा जिल्ह्यांना फायदा होणार आहे..
– या प्रकल्पाची अपेक्षित किंमत 22 हजार कोटींहून अधिक असेल. या प्रकल्पासाठी नुकतेच सर्वेक्षणही करण्यात आलं आहे.
रेल्वेमंत्र्यांनी मागवला होता प्रकल्प अहवाल..
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या काही दिवसांत इंदूर स्टेशनला भेट दिली होती तेव्हा या प्रकल्पावर चर्चा झाली होती आणि रेल्वेमंत्र्यांनी त्याचा अहवाल दिल्लीला पाठवला होता. तत्पूर्वी खासदार शंकर लालवाणी यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिल लाहोटी यांची भेट घेऊन इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करण्याची विनंती केली. त्यावर अध्यक्षांनी मध्य रेल्वेला लवकरच अहवाल सादर करण्यास सांगितले होते.