Take a fresh look at your lifestyle.

Vande Bharat Express : उद्यापासून जालना ते मुंबईचा प्रवास सुसाट ! या 8 स्टेशन्सवर असणार थांबा, पहा टाइम टेबल..

0

बहुप्रतीक्षित ‘वंदे भारत’ अखेर मराठवाड्यात दाखल झाली. गुरुवारी (दि. 28) जालना ते मनमाडदरम्यान या रेल्वेच्या आठ डब्यांची चाचणी यशस्वी ठरली. या रेल्वेचे आता 30 डिसेंबरला लोकार्पण होणार आहे. दरम्यान, या रेल्वेमुळे प्रवाशांचा मुंबई प्रवास सुसाट आणि सुखकर होणार आहे.

‘वंदे भारत’ ही रेल्वे प्रवाशांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहे. ही रेल्वे आता जालना ते मुंबई चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे विभागाकडून 27 डिसेंबरच्या रात्री ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (दि.28) सकाळी 8 वाजेदरम्यान जालन्याकडे रवाना झाली.

जालन्याहून ही रेल्वे टेस्ट रनसाठी सकाळी 10 वाजता मनमाडकडे निघाली व ती सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर स्टेशनवर आली. येथे दोन मिनिटे थांबल्यानंतर मनमाडकडे निघाली. मनमाडला ही रेल्वे साधारणतः दोन तासांच्या अंतराने दीड वाजता पोहोचली.

ही रेल्वे दुपारी अडीच वाजता मनमाडहून निघाली. यादरम्यान परसोडा या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आली होती. दुपारी 4.15 वाजेच्या दरम्यान ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे पोहोचली. या टेस्ट रनदरम्यान हिचा वेग, ट्रॅकची पाहणी तसेच इतर सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी लोको पायलट गुलाब बाबू, राजकुमार, ज्ञानेश्वर इंगळे, कल्पना घनावत तसेच सीसीएल जी. व्ही. गोरे यांच्यासह अनिल मिश्रा या टीमने सदर रेल्वेच्या टेस्ट रनमध्ये भाग घेतला.

उद्घाटन कार्यक्रम..

उद्घाटन कार्यक्रम या रेल्वेचे उद्घाटन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही रेल्वे सकाळी 11 वाजता जालन्याहून निघणार आहे. छत्रपती संभाजीनगरला 11.55 ला येणार असून, मनमाडला 1.42 वा. पोहोचणार आहे. कल्याणला ही रेल्वे 5.06 वाजेच्या दरम्यान पोहोचेल. ठाणे 5.28, दादर 5.50 आणि मुंबई सीएसटीएम 6.45 वाजता पोहोचणार आहे.

नियोजित वेळापत्रक..

जालना – मुंबई

जालना – 5.05 (पहाटे)
छत्रपती संभाजीनगर – 5.55
अंकाई – 7.25
मनमाड – 7.40
नाशिक – 8.38
इगतपुरी – 9.30
ठाणे – 11.10
सीएसटीएम – 11.55

मुंबई ते जालना

सीएसटीएम – 1.10 (दुपारी)
ठाणे – 1.55
इगतपुरी – 3.50
नाशिक – 4.28
मनमाड- 5.30
अंकाई – 6.10
औरंगाबाद – 7.08
जालना रात्री 8.30

Leave A Reply

Your email address will not be published.