भूमी अभिलेख विभागाने तलाठी मंडल अधिकाऱ्यांच्या कामात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी गावनिहाय प्रलंबित फेरफारची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे . त्यामुळे कोणती नोंद कधी मंजूर केली, कोणती नोंद प्रलंबित आहे आपल्या अर्जाच्या आधी कोणाची नोंद मंजूर केली आहे. हे सुद्धा समजणार आहे. त्यामुळे वशिलेबाजीला लगाम बसून नागरिकांचा सुद्धा यावर लक्ष राहणार आहे.
जमीन खरेदी- विक्रीचा दस्तावरून सातबारा उताऱ्यावर नोंद घेणे, वारस नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, बोजा दाखल करणे, अथवा कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, विश्वस्थांचे नाव बदलणे आदी फेरफार नोंदविण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अथवा तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज दाखल करावा लागतो, तलाठी त्या नोंदीचा फेरफार धरून तो मान्यतेसाठी मंडल अधिकारी यांच्याकडे ऑनलाइन पाठविण्यात येतो.
मात्र, काही तलाठ्यांकडून फेरफार जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचे प्रकार घडत आहे. वाद अथवा हरकत नसेल, तर नियमाने एक महिन्याच्या आत या दोन्ही नोंदी झाल्या पाहिजेत. परंतु, काही तलाठी मंडल अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला जात असल्याचे समोर आले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर तलाठी यांच्याकडील गावनिहाय तलाठी यांच्याकडील प्रलंबित फेरफारची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तलाठी यांच्याकडील प्रलंबित फेरफार याची माहिती सर्वांना उपलब्ध होत आहे.
7/12, वारस नोंदी, बोजा, शेरा, ई. प्रलंबित फेरफार पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
फेरफारवरील नोटीस कधी बजावली, हरकत कालावधी, हरकत प्राप्त झाली का, आदींची माहिती यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. जर हरकत नसेल तरी नोंद प्रलंबित असेल त्याची माहिती नागरिकांना मिळणार आहे. तसेच, अर्जाच्या क्रमाने नोंद मंजूर न करता वशिलेबाजीने आधी कोणाची नोंद मंजूर केली आहे, हे सुद्धा नागरिकांना दिसणार आहे. त्यामुळे वशिलेबाजीला लगाम बसून पारदर्शकपणे आणि अजांच्या क्रमाने तलाठी यांच्याकडील फेरफार नोंद मंजूर होईल , असा दावा भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात येत आहे.
याविषयी माहिती देताना जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू म्हणाले, नागरिकांना संकेतस्थळावर गावनिहाय प्रलंबित फेरफार नोटीस याची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे फेरफार नोंदीबाबत नोटीस कधी बजावली, हरकत कालावधी कधी समाप्त होत आहे. हरकत आली असेल तर त्याचा उल्लेख याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.