राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना ही प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकार लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करेल. ही आर्थिक मदत मुलीचे वय 18 वर्ष होईपर्यंत सरकारकडून दिली जाईल. जे वर्ग श्रेणीनुसार वेगवेगळ्या वयोगटात दिले जातील ‘लेक लाडकी योजना’ विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. याद्वारे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते.

किती टप्प्यांत मिळणार आर्थिक मदत..

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, अकरावीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळेल . शासनामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरण डीबीटीद्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे .

या मुली होणार पात्र.

1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.

मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

एप्रिल 2023 नंतर 1 मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल.

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.. 

लाभार्थीचा जन्माचा दाखला,
कुटुंबप्रमुखाचा तहसीलदार उत्पन्नाचा दाखला
लाभार्थीचे आधारकार्ड ,
पालकाचे आधारकार्ड ,
बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड साक्षांकित प्रत)
मतदान ओळखपत्र
संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील..

महाराष्ट्र ‘लेक लाडकी’ योजना

PDF फॉर्म

 

योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश.. 

‘लेक लाडकी’ ही राज्यसरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून योजनेत लाभार्थीची ग्रामीण भागात पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडीसेविका, संबंधित पर्यवेक्षिका, नागरी भागात मुख्यसेविका यांची राहील.

लाभार्थीची माहिती ऑनलाइन भरून अंतिम मंजुरी संबंधित महिला व बालविकास अधिकारी देतील. लाभार्थ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा, यासाठी नुकतेच आढावा सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. लाभार्थ्यांनी सुद्धा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा. .

आयुष सिंह – मुख्य कार्यकारी अधिकारी..

2023-24 च्या अर्थसंकल्पीय विशेष तरतूद..

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे ‘ लेक लाडकी योजने’ मध्ये लाभार्थ्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित होते. अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाचे वर्ष निवडणूक वर्ष असल्याने राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवारांनी

गेल्या वर्षी सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आणि आगामी वर्षासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या विशेष तरतूदींचा लेखाजोखा सरकारसमोर मांडला .

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेबाबत मोठी घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *