Take a fresh look at your lifestyle.

Gold Price : सोन्या-चांदीचे रेट घसरले, 18 कॅरेट सोनं आलं 35 हजारांवर ; जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

शेतीशिवार टीम, 30 डिसेंबर 2021: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. 24 कॅरेट शुद्ध सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झालं आहे. आता 14 कॅरेट सोन्याचा भाव फक्त 27985 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आलं आहे.

या बदलानंतर, आता 24 कॅरेट शुद्ध सोनं 56126 रुपयांच्या सर्वकालीन उच्च दरावरून 8416 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झालं आहे आणि चांदी गेल्या वर्षीच्या 76004 रुपयांच्या कमाल दरापेक्षा 14912 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.

इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार, बुधवारच्या बंद दराच्या तुलनेत आज सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम फक्त 38 रुपयांनी घसरून 47838 रुपयांवर आला.

तर आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 43820 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव आता फक्त 35879 रुपये झाला आहे. यावर 3% GST आणि मेकिंग चार्ज वेगळा आहे.

पुण्यात आज (30 डिसेंबर) ला सोन्याचा दर 48,960.0 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 63,290.0 रुपये प्रति किलो होता.

 धातू व शुद्धता 30 डिसेंबरचे रेट (रुपये/10 ग्राम) 29 डिसेंबरचे रेट (रुपये/10 ग्राम) रेट बदल
(रुपये/10 ग्राम)
Gold 999 (24 कॅरेट )  47838  47876  -38
Gold 995 (23 कॅरेट )  47646  47684  -38
Gold 916 (22कॅरेट )  43820  43854  -34
Gold 750 (18 कॅरेट )  35879  35907  -28
Gold 585 ( 14 कॅरेट )  27985  28007  -22
Silver 999  61096 Rs/Kg  61588 Rs/Kg -492 Rs/Kg