Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : भ्रष्टाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गौतम अदाणींवर अमेरिकेत गुन्हा दाखल ; समन्सही जारी…

शेतीशिवार टीम : 1 सप्टेंबर 2022 : देशाला हादरा देणारी बातमी समोर आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आहे.

भारतीय वंशाच्या डॉक्टरने भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक मुद्द्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी तिन्ही नेत्यांसह इतर अनेकांना समन्स बजावलं आहे.

भारतीय वंशाचे रिचमंड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश वुय्युरु यांनी पीएम मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या एका भारतीय – अमेरिकन डॉक्टरने हा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच या प्रकरणात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस एम. श्वाब यांचेही नाव आहे.

तक्रारीत केलेत हे गंभर आरोप :-

डॉक्टरांनी आरोप केला आहे की पीएम मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्यासह इतर लोक अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ट्रांसफर करत आहेत आणि राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस स्पायवेअर सारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवली गेली. तसेच PM केयर फंड, राफेल घोटाळ्यांसह ते मोट मोठ्या भ्रष्टाचारात गुंतले आहेत.

24 मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने 22 जुलै रोजी समन्स जारी केले होते. भारतात हे समन्स 4 ऑगस्टला पाठवण्यात आले होते. तसेच ते 2 ऑगस्ट रोजी क्लॉस एम श्वाब येथे पोहोचले.

वृत्तसंस्थेनुसार, रवी बत्रा यांनी याबाबत सांगितले की, लोकेश वुय्युरुने वेळ वाया घालवला आहे. 53 पानांच्या तक्रारीद्वारे ते आमच्या फेडरल न्यायालयांचा गैरवापर करत आहेत.

अमेरिकन सहयोगी भारताची बदनामी आणि अपमान करण्यासाठी त्यांनी विदेशी सार्वभौम प्रतिरक्षा कायद्याच्या विरोधात हे प्रकरण केलं आहे. ते म्हणाले, हे निरर्थक प्रकरण आहे, त्यामुळे एकही वकील यावर त्यांची बाजू मांडायला सध्या तरी तयार नाही…