Take a fresh look at your lifestyle.

Tests After 30 : वयाच्या 30 नंतर प्रत्येक तरुणाने जरूर कराव्या या 6 Test ; अन्यथा खूपचं पस्तावण्याची वेळ येईल …

महा – अपडेट टीम, 28 मे 2022 :- प्रत्येक व्यक्ती वयानुसार आजारांच्या जवळ जाऊ लागतो आणि एक वेळ अशी येते की, रोगानी आपली पकड घेतली आणि तो त्या रोगांपासून बचाव करण्याचे मार्ग शोधू लागतो. मात्र, वयाच्या 30 वर्षानंतर ते होऊ लागतं. त्याच वेळी, वयाच्या 30 नंतर पुरुषांच्या जबाबदाऱ्या वाढू लागतात. हे असे वय आहे जेव्हा पुरुष कुटुंब आणि करिअरमधील योग्य संतुलन साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. आणि या काळात त्यांना आरोग्याच्या समस्यांना बळी पडण्याचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत त्यांना आरोग्याच्या संभाव्य धोक्यांची वेळीच जाणीव होणे गरजेचे आहे.

30 वर्षांनंतर पुरुषांमध्ये अनेकदा आजार डोकावू लागतात, परंतु काही आरोग्य तपासणी करून ते या धोक्यांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतात. अशा कोणत्या टेस्ट आहेत, ज्यामुळे भविष्यातील धोक्यापासून वाचता येऊ शकतं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर आपण अशाच 6 Testबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक व्यक्तीने करायला हव्यात….

वयाच्या 30 नंतर, सर्व पुरुषांनी या 6 Test अवश्य कराव्यात :-

मधुमेह (Diabetes) :-

सर्वात महत्वाची टेस्ट म्हणजे मधुमेह. मधुमेह हा सामान्य आजार नाही, यामुळे तुम्ही इतर अनेक समस्यांना बळी पडू शकता. असा अंदाज आहे की, एक चतुर्थांश लोकांमध्ये मधुमेहाचे निदान वेळेत होत नाही. डायबिटीजच्या (Diabetes) या टेस्टद्वारे, दिनचर्यामध्ये बदल करून तुम्ही हा आजार टाळू शकता की नाही हे कळतं.

द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये असं म्हटलं आहे की, दिवसातून 30 मिनिटे व्यायाम केल्याने आणि तुमचे वजन फक्त 5% कमी केल्याने तुमचा मधुमेहाचा धोका कमी होतो. या संशोधनात असं म्हटलं आहे की, फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने मधुमेहाचा धोका 58 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. वर्षातून एकदा मधुमेहाची (Diabetes) तपासणी करणे आवश्यक आहे.

एचआयव्ही (HIV) :-

द टेरेन्स हिगिन्स – ट्रस्टच्या आकडेवारीनुसार, ब्रिटनसारख्या विकसित देशातही एचआयव्ही (HIV) बाधित 33% लोकांना हे माहीतही नसतं की, ते स्वतः संक्रमित झाले आहेत. त्यामुळेच त्यांचा सल्ला आहे की, तुम्ही पूर्ण संरक्षण घेतले असेल, पण तरीही तपासणी करून घेणे वाईट नाही. या टेस्टसाठी HIV / ELISA सर्वोत्तम मानली जाते. ही एक साधी ब्लड टेस्ट आहे. याशिवाय, वेस्टर्न ब्लॉट द्वारे देखील याची पुष्टी केली जाऊ शकते. यामध्ये अनेक प्रकारच्या टेस्ट करता येतात. पुरुषांनी दर पाच वर्षांनी ते तपासले पाहिजे…

टेस्टिक्युलर कर्करोग (Testicular cancer) :-

कॅन्सर रिसर्च यूकेच्या मते, 20 ते 39 वयोगटातील पुरुषांमध्ये टेस्टिक्युलर कॅन्सर हा सर्वात सामान्य आजार आहे. या आजाराचे वेळीच निदान झाले तर तो सहज बरा होऊ शकतो. दुखणे हे एकमेव लक्षण असलं तरी त्यासाठी तुम्हाला नियमित स्वत: ची तपासणी करणे आवश्यक आहे. असामान्य सूज वर लक्ष ठेवा. तुम्ही तुमच्या अंगठ्याने आणि अनामिकेने ही गाठ शोधू शकता. सहसा ही गाठ मटारच्या आकाराची असते. यासाठी तुम्ही कोमट पाण्याच्या आंघोळीनंतर स्क्रोटमची टेस्ट करावी. पुरुषांनी दर महिन्याला त्याची तपासणी करून घ्यावी..

कोलेस्टेरॉल (Cholesterol) :-

एलडीएल (LDL) कोलेस्टेरॉल म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराचे प्रमुख कारण मानले जाते. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की हृदयविकाराच्या झटक्यांपैकी ५०% रुग्णांमध्ये LDL पातळी सामान्य असते? त्यामुळे जर तुम्हाला हृदयाची समस्या किंवा रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या हृदयाची नियमित तपासणी करून घ्या. यावरून तुमच्या हृदयाच्या आरोग्याची कल्पना येईल. पुरुषांनी दर पाच वर्षांनी एकदा त्यांच्या कोलेस्टेरॉलची तपासणी करावी.

बीएमआय (BMI) :-

लठ्ठपणा हा आजकाल एक मोठा आजार झाला आहे. जगभरातील लाखो लोकांना याचा त्रास होत आहे. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग यांसारखे आजार होऊ शकतात. बीएमआय (BMI) ही एक टेस्ट आहे जी तुमच्या उंचीनुसार तुमचे योग्य वजन ठरवू शकते. तुमचे वजन जास्त आहे की तुम्ही धोक्याच्या जवळ आहात हे ही टेस्ट दाखवते. 18.5 आणि 24.9 मधील बीएमआय (BMI) योग्य मानला जातो. जर तुमचा बीएमआय (BMI) जास्त असेल तर हे तुम्हाला वजन कमी करण्याची गरज असल्याचे लक्षण आहे. पुरुष दर तीन वर्षांनी किंवा वजन वाढल्यास ते तपासू शकतात…

दंत तपासणी (Dental examination) :-

दातांच्या समस्या आणि हृदयविकाराचा थेट संबंध आहे. जेव्हा तोंडात असलेले बॅक्टेरिया रक्ताद्वारे शरीरात जातात, तेव्हा ते हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होऊ शकते. चांगली गोष्ट म्हणजे हिरड्यांची समस्या वेळीच पकडली तर ती पूर्णपणे बरी होऊ शकते. पुरुषांनी वर्षातून दोनदा तपासले पाहिजे…