Take a fresh look at your lifestyle.

कधीकाळी या इलेक्ट्रिक SUV ला कोणीही घेत नव्हतं ; आता 10,000% नी वाढली विक्री, 452Km रेंज सह पहा, फीचर्स अन् किंमत…

शेतीशिवार टीम : 14 सप्टेंबर 2022 : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. जरी Tata Nexon EV अजूनही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे आणि ती सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार देखील आहे, परंतु मागील महिन्यात ऑगस्टमध्ये Hyundai च्या इलेक्ट्रिक SUV Hyundai Kona च्या विक्रीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

या कारला महिन्यात केवळ 1 खरेदीदार मिळाला असताना, ऑगस्ट महिन्यात या इलेक्ट्रिक SUV ने दशक पूर्ण केलं आहे. हा आकडा खूप जास्त नसला तरी या SUV च्या विक्रीत कमालीची वाढ झाली आहे, आणि कंपनीचे मनोधैर्य उंचावण्यास नक्कीच मदत होईल याची खात्री आहे.

Hyundai Kona ही कंपनीने भारतीय बाजारपेठेत सादर केलेली पहिली इलेक्ट्रिक SUV आहे आणि ही कार बाजारात मोठ्या प्रमाणात लाँच करण्यात आली होती. मात्र तिच्या हाय प्राईसमुळे ही कार अजूनही सर्वसामान्य भारतीय ग्राहकांच्या आवाक्यांपासून दूर आहे. पण तरीही Hyundai Kona च्या चाहत्यांची कमतरता नाही.

ऑगस्ट महिन्यात, कंपनीने या इलेक्ट्रिक SUV च्या एकूण 1002 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात विकल्या गेलेल्या फक्त 1 युनिटपेक्षा पूर्ण 101000% जास्त आहे.चला तर मग जाणून घेऊया कशी आहे नवीन Hyundai Kona :-

Hyundai Kona इलेक्ट्रिक चे डिटेल्स :-

फाईव्ह सीटर इलेक्ट्रिक SUV एकूण दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रीमियम आणि ड्युअल टोनचा समावेश आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 23.84 लाख रुपये आणि 24.03 लाख रुपये (Ex-showroom ) आहे. कंपनीने यामध्ये 39.2kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे आणि त्याची इलेक्ट्रिक मोटर 136PS पॉवर आणि 395Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जवर 452Km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते आणि फक्त 9.7 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते.

Hyundai Kona इलेक्ट्रिकला तीन चार्जिंग ऑप्शन मिळतात : 2.8kW पोर्टेबल चार्जर, 7.2kW वॉल-बॉक्स चार्जर आणि 50kW फास्ट चार्जर. पहिले दोन अनुक्रमे 19 तास आणि 6 तास 10 मिनिटांत कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज करू शकतात. त्याच वेळी, 50kW फास्ट चार्जर केवळ 57 मिनिटांत 0-80% बॅटरी चार्ज करू शकतो. कार तीन वेगवेगळ्या ड्रायव्हिंग मोडमध्ये बदलली जाऊ शकते जसे की इको, इको+, कम्फर्ट आणि स्पोर्ट. रीजनरेटिंग ब्रेकिंग कंट्रोल करण्यासाठी स्टीयरिंग व्हीलच्या मागे पॅडल प्रदान केलं जातं.

मिळतात ही खास फीचर्स :-

ह्युंदाई कोना (Hyundai Kona) इलेक्ट्रिकच्या फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एक सनरूफ, मागील व्हेंटसह ऑटो एसी, वायरलेस फोन चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, क्रूझ कंट्रोल आणि 10-वे पॉवर-अँडजस्टेबल ड्रायव्हर सीट मिळेल.

याशिवाय सेफ्टीसाठी या कारला 6 एअरबॅग्ज, व्हीकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल असिस्ट कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, एक रियर कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) देखील दिलेआहेत.या महिन्यात कंपनी या कारवर 50,000 रुपयांची सूटही देत ​​आहे.