शानदार स्पेससह 31Km मायलेज ; जुलै महिन्यात ‘या’ बेस्ट फॅमिली Car ची 13,447 युनिट्सची विक्री ; टॉप 25 मध्ये एकमेव Sedan Car, पहा किंमत…
शेती-शिवार टीम : 5 ऑगस्ट 2022 :- Sedan Car कडे एक बेस्ट फॅमिली कार म्हणून पाहिलं जातं आणि अलीकडच्या काळात कॉम्पॅक्ट सेडानची मागणी झपाट्याने वाढली आहे. कमी किमती, उत्तम मायलेज आणि डिमांड यामुळे या सेगमेंटच्या गाड्या लोकप्रिय ठरल्या आहेत.
आतापर्यंत या सेगमेंटमध्ये मारुती व्यतिरिक्त होंडा, ह्युंदाई आणि इतर कंपन्यांच्या कारचाही सर्वाधिक विक्रीच्या लिस्टमध्ये समावेश करण्यात आला होता, परंतु जुलै महिन्यात मारुती डिझायर (Maruti Dzire) ही एकमेव सेडान कार ठरली ज्याने टॉप 25 लिस्टमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. ही कार नुकतीच अपडेट करून बाजारात आणली गेली आहे आणि ती पेट्रोल इंजिन तसेच CNG व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
कंपनीने सादर केलेला ग्रोथ रिपोर्ट पाहता, गेल्या जुलैमध्ये कंपनीने एकूण 13,447 युनिट्सची विक्री केली आहे, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात केवळ 10,470 युनिट्सच्या तुलनेत 31% वाढली आहे. याशिवाय दुसरी कोणतीही सेडान कार या यादीत स्थान मिळवू शकलेली नाही. मात्र, Honda Amaze, Hyundai Aura आणि Tata Tigor सारख्या गाड्याही बाजारात आहेत.
न्यू मारुती Maruti Dzire मध्ये काय आहे खास : –
मारुती सुझुकीने नुकतीच नवीन फेसलिफ्ट डिझायर बाजारात आणली आहे. मारुती डिझायरचे VXi आणि ZXi व्हेरियंट एकूण 4 ट्रिममध्ये कंपनीने फिट केलेले CNG सह येतात. यामध्ये, कंपनीने 1.2-लीटर ड्युअल-जेट पेट्रोल इंजिन युज केलं आहे जे 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑप्शनल ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जुळते. याचे पेट्रोल व्हेरियंट 23 Km पर्यंत मायलेज देते, तर CNG व्हेरिएंट सेगमेंटमधील सर्वाधिक मायलेजसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीचा दावा आहे की त्याचे CNG प्रकार 31.12 Km पर्यंत मायलेज देते.
फीचर्समध्ये क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक एलईडी हेडलाइट्स, ऑटो-फोल्डिंग ORVM, पुश-बटण इंजिन स्टार्ट/स्टॉप आणि ऑटो एसीसह मागील व्हेंट्स यांचा समावेश आहे. Android Auto आणि Apple CarPlay सह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 4.2-इंच मल्टी-कलर MID याला आणखी खास बनवतं. या कारची किंमत 6.24 लाख ते 9.18 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकीच्या सध्याच्या अपडेट्स कंपनी आपली सर्वात स्वस्त कार मारुती अल्टो K10 18 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार लॉन्च होण्यापूर्वीच तिचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. कंपनीने या कारच्या बाहेरील आणि आतील भागात खूप बदल केले आहेत. याशिवाय या कारमध्ये 1.0 लीटर क्षमतेचे नवीन पॉवरफुल इंजिन दिलं जाणार आहे.