Take a fresh look at your lifestyle.

मुलींसाठी बेस्ट हल्की-फुल्की इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 110 Km रेंज ; पहा, फीचर्स अन् किंमत…

शेतीशिवार टीम : 31 जुलै 2022 :- इलेक्ट्रिक टू व्हीलर बनवणारी Tunwal ची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर Tunwal Sport 63 Mid ला त्याच्या पॉवरफुल बॅटरी पॅक आणि हलक्या वजनासाठी पसंत केलं जातं. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला अधिक ड्राईव्ह रेंजसह जबरदस्त ॲडव्हान्स फीचर्स पाहायला मिळतात.

जर तुम्ही या कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपण या स्कुटरच्या फीचर्सपासून ते स्पेसिफिकेशन्सपर्यंत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत…

Tunwal Sport 63 Mid इलेक्ट्रिक स्कूटरचे स्पेसिफिकेशन :-

Tunwal Sport 63 Mid इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, कंपनीने 60 V, 26 Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे आणि कंपनीने हा बॅटरी पॅक BLDC टेक्नॉलॉजी बेस्ड मोटरशी जोडला आहे. या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, सिंगल पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, ती 110Km पर्यंत चालवता येते.

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचं झालं तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिलं आहे.

यासोबतच कंपनी तुम्हाला कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम देते. कंपनी या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरसह अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर ऑफर करते.

Tunwal Sport 63 Mid इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स :-

Tunwal Sport 63 Mid इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला अनेक जबरदस्त आणि मॉडर्न फीचर्स पाहायला मिळतात. कंपनी या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये चार्जिंग पॉइंट, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प यांसारखे फीचर्स प्रदान करते.

यासोबतच यामध्ये तुम्हाला उत्कृष्ट सस्पेंशनही मिळते. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढील भागात हायड्रोलिक सस्पेंशन सिस्टीम आणि मागील बाजूस स्प्रिंग बेस्ड शॉक ऍब्जॉर्बर सस्पेंशन सिस्टीम बसवली आहे.

टुनवाल स्पोर्ट 63 मिड इलेक्ट्रिक स्कूटरची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत ₹ 71,990 ठेवण्यात आली आहे आणि तिची ऑन-रोड किंमतही इतकीच आहे.