Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांची राणी Mahindra Scorpio N अखेर लॉन्च ; पहा फीचर्स, बुकिंग डिटेल्स, प्राइस लिस्ट, किंमत फक्त…

शेतीशिवार टीम, 28 जून 2022 : महिंद्राची बिग डॅडी एसयूव्ही ऑल न्यू Scorpio N अखेर लॉन्च झाली आहे. मात्र, परंतु बुकिंग आणि डिलिव्हरीसाठीतुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कंपनी 30 जुलैपासून या SUV ची बुकिंग सुरू करणार आहे. इतकंच नाही तर महिंद्र सुरूवातीला फक्त 25 हजार बुकिंग घेणार आहे.

म्हणजेच, या SUV ची विक्री प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे. त्याचबरोबर फेस्टिवल सिझन पासून त्याची डिलिव्हरी सुरू केली जाणार आहे. तसेच, ज्या ग्राहकांना ही SUV खरेदी करण्यापूर्वी टेस्ट ड्राइव्ह घ्यायची आहे, ते 5 जुलैपासून देशातील 30 शहरांमध्ये टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकतील. उर्वरित शहरांमध्ये 15 जुलैपासून टेस्ट ड्राइव्ह सुरू होणार आहे.

मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत आली समोर…

महिंद्राने Scorpio N च्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंट साठी मॅन्युअल ट्रान्समिशन किमती जाहीर केल्या आहेत. परंतु, जाहीर झालेल्या किंमती केवळ सुरुवातीच्या 25 हजार बुकिंगसाठी असणार आहे. म्हणजेच कंपनी नंतर त्याची किंमत वाढवू शकते. एकंदरीत ज्या ग्राहकांना ती खरेदी करायची आहे त्यांनी अजिबात वाट न पाहता लवकरात लवकर बुकिंग करावं लागणार आहे…

Scorpio N, Z2 च्या स्टार्टींग पेट्रोल व्हेरियंटची किंमत 11.99 लाख (Ex-showroom) रुपये आहे. पेट्रोलमधील टॉप व्हेरिएंट Z8L ची किंमत 18.99 लाख रुपये आहे. हे सर्व 2 व्हील ड्राइव्ह (2WD) व्हेरियंट आहेत. कंपनी 21 जुलै रोजी पेट्रोलमध्ये फोर व्हील ड्राइव्ह (4WD) ची किंमत जाहीर करणार आहे. पेट्रोल 5 व्हेरियंट मध्ये येणार आहे. सध्या यात 2WD व्हेरियंटचा समावेश नाही..

दुसरीकडे, Scorpio N, Z2 च्या स्टार्टींग डिझेल व्हेरियंटची (Ex-showroom) किंमत 12.49 लाख रुपये आहे. तर पेट्रोलमधील टॉप व्हेरिएंट Z8L ची किंमत 19.49 लाख रुपये आहे. हे सर्व 2 व्हील ड्राइव्ह (2WD) व्हेरियंट आहेत. कंपनी 21 जुलै रोजी पेट्रोलमध्ये फोर व्हील ड्राइव्ह (4WD) ची किंमत जाहीर करणार आहे. डिझेल देखील 5 व्हेरियंट मध्ये येईल. सध्या यात 2WD प्रकारांचा समावेश नाही.

महिंद्र Scorpio N ची व्हेरिएंट वाईज फीचर्स :-

Scorpio N मध्ये 175 PS पॉवरसह 2.2-लीटर डिझेल इंजिन आणि 200 PS पॉवरसह 2.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. SUV ला 4XPLOR टेरेन मॅनेजमेंट 4WD सिस्टम देखील मिळते. नवीन स्कॉर्पिओ एन Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L या 5 ट्रिममध्ये ऑफर केली आहे.

Mahindra Scorpio N Z2 :

नवीन Scorpio N चे Z2 व्हेरियंट पेट्रोल आणि डिझेल (132PS) इंजिन पर्यायांसह येते. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, माउंट केलेल्या ऑडिओ कंट्रोल्ससह इलेक्ट्रिक स्टीयरिंग (पेट्रोल), मागील एसी व्हेंट्स, सिग्नेचर ड्युअल बॅरल हेडलॅम्प, एलईडी टर्न इंडिकेटर, एलईडी टेललॅम्प आणि पेंटा लिंक सस्पेन्शन यांसारखे फीचर्स आहेत.

Mahindra Scorpio N Z4 :

Z4 ट्रिम 175PS डिझेल इंजिनसह ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑप्शनल 4X4 ड्राइव्हट्रेन सिस्टमसह येईल. यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 20.32 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रियर एसी व्हेंट मॉड्यूल, क्रूझ कंट्रोल, फुल फॅब्रिक अपहोल्स्ट्री, इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग ( डिझेल), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल आणि हिल डिसेंट कंट्रोल देण्यात आलं आहे.

Mahindra Scorpio N Z6 : –

नवीन Mahindra Scorpio N Z6 ट्रिममध्ये 175PS डिझेल इंजिन आणि मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ऑप्शन आहेत. यात अँटी-पिंचसह सनरूफ, एंटी-पिंच Amazon Alexa सह AdrenoX, नेव्हिगेशनसह 20.32 सेमी इन्फोटेनमेंट, 17.78 सेमी ड्रायव्हर माहिती डिस्प्ले, अलेक्सा सक्षम ESC, ड्रायव्हर मोड, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कारमधील अॅप्स आणि रिमोट कमांड्स आणि कंट्रोल्स आहेत…

Mahindra Scorpio N Z8 :-

Z8 ट्रिमला नवीन कॉफी ब्लॅक लेदरेट इंटीरियर, पुश बटण स्टार्ट, पॅसिव्ह कीलेस एंट्री, पॉवर फोल्ड ORVM, 4Xplor – इंटेलिजेंट टेरेन मॅनेजमेंट सिस्टम, साइड आणि कर्टन एअरबॅग्ज, ड्युअल झोन FATC सह मागील AC, डबल बॅरल एलईडी हेडलॅम्प, LED प्रोजेक्टर फॉग लॅम्प, LED DRLs, LED अनुक्रमिक टर्न इंडिकेटर, मागील कॅमेरा आणि R17 (MT) आणि R18 मिश्र धातु (MT) अलॉय दिले आहेत.
Mahindra Scorpio N Z8L :

नवीन Mahindra Scorpio N Z8 L ट्रिममध्ये खास पॉवर सीट्स, 12 स्पीकर सोनी ऑडिओ सिस्टम, कॅप्टन सीट्स ऑप्शन, फ्रंट कॅमेरा, ड्रायव्हर ड्राय डिटेक्शन, फ्रंट पार्क असिस्ट सेन्सर आणि वायरलेस चार्जिंग (4WDAT) मिळते.