Take a fresh look at your lifestyle.

शोरूममध्ये जा अन् ताबडतोब खरेदी करा मारुती Fronx ! मिळतोय तब्बल 83 हजारांचा डिस्काउंट, किंमत 7 लाखांपेक्षा कमी..

लाँच झाल्यापासून मारुती सुझुकी Fronx ला मिळालेला वेग कायम आहे. कंपनीसाठी हे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल बनले आहे. दर महिन्याला कंपनीच्या टॉप-10 कारच्या लिस्टमध्ये आता Fronx चाही समावेश झाला आहे. अशा परिस्थितीत आपली विक्री वाढवण्यासाठी कंपनी या महिन्यात 75,000 रुपयांचा डिस्काउंट देत ​​आहे.

हा डिस्काउंट फ्रॉक्स मॉडेल वर्ष 2023 आणि मॉडेल वर्ष 2024 वर स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. Fronx च्या खरेदीदारांना रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि स्क्रॅपेज अंतर्गत फायदे मिळतील. कंपनी आपल्या पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल्सवर डिस्काउंट देत आहे. चला तुम्हाला त्याच्या डिसकाउंटची संपूर्ण लिस्ट पाहूया..

मारुती Fronx (MY23) 1.0 – लिटर टर्बो पेट्रोल व्हेरियंट ..

सवलत रोख – 60,000
एक्सचेंज – ₹ 10,000
स्क्रॅपेज – ₹ 15,000

एकूण – 75,000 / एक्सचेंज किंवा स्क्रॅपेजपैकी कोणतेही एक.

मारुती सुझुकीने विक्री वाढवण्यासाठी Fronx ची Turbo Velocity Edition लाँच केलं आहे. नवीन Fronx मॉडेल कॉस्मेटिक ॲक्सेसरीजसह येते, जे डेल्टा प्लस, झेटा आणि अल्फा ट्रिम्ससह 2023 आणि 2024 दोन्ही मॉडेल्सवर ऑफर केले जाते.

फ्रंट बंपर व्हेलॉसिटी एडिशनसह 16 ॲक्सेसरीज ऑफर केल्या आहेत, ज्यात एक्सटीरियर स्टाइलिंग किट (ग्रे + रेड), डोअर व्हिझर प्रीमियम, फ्रंट बंपर पेंटेड गार्निश, ORVM कव्हर आणि हेडलॅम्प गार्निश यांचा समावेश आहे.

यासोबतच तुम्हाला मारुती सुझुकी फ्रॉन्क्समध्ये बॉडी साईड मोल्डिंग, रिअर बंपर पेंटेड गार्निश, इल्युमिनेटेड डोअर सिल गार्ड, रिअर अप्पर स्पॉयलर एक्स्टेंडर, व्हील आर्क गार्निश, फ्रंट ग्रिल गार्निश आणि बॅक डोअर गार्निश देखील मिळतात. डिस्काउंटची लिस्ट खाली पहा.

फ्रॉक्स 2024 च्या किमतीत 10,000 रुपयांची वाढ..

मारुती फ्रॉक्स खरेदी करणे आता महाग झाले आहे. कंपनीने या एसयूव्हीच्या व्हेरिएंट आणि फीचर्सनुसार किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे ही कार खरेदी करणे आता 10,000 रुपयांनी महागले आहे. कंपनीने आपल्या सिग्मा 1.2 एमटी, डेल्टा 1.2 एमटी, सिग्मा 1.2 सीएनजी, डेल्टा 1.2 सीएनजी आणि डेल्टा प्लस 1.2 एमटीच्या किमती 5000 रुपयांनी वाढवल्या आहेत. दुसरीकडे, Zeta 1.0 Turbo 6AT आणि Alpha 1.0 Turbo 6AT च्या किंमतीत 10,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. FrontX coupe-SUV च्या नवीन एक्स-शोरूम किमती आता 7.51 लाख ते 13.13 लाख रुपये आहेत..

Fronx ची फीचर्स आणि डिट्टेलस..

मारुती फ्रॉक्सला 1.0 – लिटर टर्बो बूस्टरजेट इंजिन मिळते. ते 5.3-सेकंदात 0 ते 60 किमी / ताशी वेग वाढवते. याशिवाय, यात प्रगत 1.2-लीटर के-सिरीज, ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन आहे. हे इंजिन स्मार्ट हायब्रीड टेक्नॉलॉजीसह येते. हे इंजिन पॅडल शिफ्टर्ससह 6 – स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहेत. त्यात ऑटो गियर शिफ्टचा ऑप्शनही उपलब्ध आहे. त्याचे मायलेज 22.89km/l आहे. मारुती फ्रंटची लांबी 3995 मिमी, रुंदी 1765 मिमी आणि उंची 1550 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 2520mm आहे. यात 308 लीटरची बूट स्पेस आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हेड – अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील, 16 – इंच डायमंड कट अलॉय व्हील, ड्युअल-टोन एक्सटीरियर कलर, वायरलेस चार्जर, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 – स्पीकर साउंड सिस्टम, इन्स्ट्रुमेंट. क्लस्टरमध्ये कलरफूल एमआयडी, हाय ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, बॅक एसी व्हेंट्स, फास्ट यूएसबी चार्जिंग पॉइंट, कनेक्टेड कार फीचर्स, बॅक कॅमेरा आणि 9 – इंच टचस्क्रीन यांसारखे फीचर्स असतील. हे अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करेल..

सेफ्टीसाठी, या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, रियर व्ह्यू कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, 3-पॉइंट ELR सीट बेल्ट, रिअर डीफॉगर, अँटी थेफ्ट सिक्युरिटी सिस्टम, आयएसओफिक्स चाइल्ड सीटसह साइड आणि कर्टन एअरबॅग्ज आहेत.त्याच वेळी, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESP, हिल-होल्ड असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर, लोड-लिमिटरसह सीटबेल्ट प्री-टेन्शनर, सीटबेल्ट रिमाइंडर सिस्टम, Isofix चाइल्ड सीट अँकरेज पॉइंट आणि स्पीड अलर्ट यासारखी सेफ्टी स्टॅंडर्ड फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय, काही व्हेरियंटमध्ये 360 – डिग्री कॅमेरा, साइड आणि कर्टेन एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि ऑटो – डिमिंग IRVM मिळतात..

मारुती Jimny आणि बलेनोवर मोठी सूट..

मारुती जिमनी MY2023 वर 1.5 लाखांपर्यंतच्या ऑफर उपलब्ध आहेत. यामध्ये 3000 रुपयांच्या एक्सचेंज आणि कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे. त्याच वेळी, Baleno 2024 मॉडेलवर 20,000 रुपयांची सूट मिळू शकते. यामध्ये रु. 17,000 एक्सचेंज बोनस आणि रु 2,000 कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

Maruti Fronx MY2024 वर 30,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर Maruti Fronx MY2023 देखील 60 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफरसह उपलब्ध आहे. यामध्ये 10,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे.

ग्रँड विटारा MY2023 वर 25,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. याशिवाय, ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या डीलरशीपशी संपर्क साधू शकता..