Take a fresh look at your lifestyle.

ना पेट्रोल दरवाढीचं टेन्शन ना DL चं टेन्शन । फक्त 60 हजारांत घरी आणा या स्वस्त Electric Scooter, ड्रायव्हिंग रेंजही उत्तम !

शेतीशिवार टीम : 17 जुलै 2022 :- देशातील पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीने जवळपास प्रत्येक वाहनचालकाला कपाळावर हात लावायची वेळ आणली आहे. दैनंदिन प्रवासासाठी पेट्रोलचे दर वाढल्याने दुचाकी वाहनधारकही चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत पेट्रोलऐवजी इलेक्ट्रिक दुचाकींकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. जरी बाजारात ओला (OLA), बजाज (Bajaj), एथर एनर्जी (Ather Energy) आणि ओकिनावा (Okinawa) सारख्या अनेक कंपन्या आहेत, ज्या एकापेक्षा एक इलेक्ट्रिक स्कूटर विकत आहेत.

पण आपण या लेखात अशा इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे उत्तम ड्रायव्हिंग रेंजसह कमी किमतीत तर उपलब्ध आहेतच पण त्यांना चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणीचीही गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल…

Hero Electric Flash LX :-

हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric) हे या सेगमेंटमधील सर्वात जुने नाव असल्याने, मुंजाल कुटुंबाने टू व्हीलर मार्केटमध्ये दीर्घकाळापासून आपली पकड कायम ठेवली आहे. ही कंपनी Hero MotoCorp पेक्षा वेगळी असली तरी. या कंपनीच्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आहेत, त्यापैकी Flash LX एक आहे. कंपनीने 250w (Watt) ची इलेक्ट्रिक मोटर आणि त्यात 51.2V/30Ah क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे.

या स्कूटरचा टॉप स्पीड 35Km प्रतितास आहे आणि ती एका चार्जमध्ये 85 Km पर्यंत चालते. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 ते 5 तास लागतात. 12 इंच चाकांवर चालणाऱ्या या इलेक्ट्रिक स्कूटरला नोंदणीची गरज नाही. त्याची किंमत 59,640 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Okinawa Lite :-

Okinawa ची परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर Lite हि देखील तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकते. स्कूटर 250 W (Watt) BLDC मोटरसह 1.25 KWH डिटेचेबल लिथियम बॅटरी यात वापरली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर ताशी 25Km आणि एका चार्जवर 60 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. यात युनिक डिझाइन आणि एलईडी विंकर्ससह इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टम (E-ABS) आहे. या स्कूटरसोबत कंपनी 3 वर्षे किंवा 30,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देत ​​आहे. त्याची किंमत 66,993 रुपये निश्चित करण्यात आली आहे. आणि ग्राहक या मॉडेल ची 2,000 रुपयांमध्ये बुकिंग करू शकतात…

Hero Eddy :-

ही स्कूटर तिच्या खास लुकमुळे खूप लोकप्रिय आहे. ही स्कूटर कमी-स्पीड आणि शहरातील राइड्साठी चांगलीच प्रसिद्ध आहे. यामध्ये कंपनीने टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन, क्रूझ कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फाइंड माय बाईक, ई-लॉक, फॉलो मी, रिव्हर्स मोड आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. या स्कूटरचा वेगही 25Km प्रति तास आहे आणि एका चार्जमध्ये ती 85 किलोमीटरपर्यंत चालवता येते.

250W BLDC इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असलेल्या, या स्कूटरमध्ये 51.2V/30Ah क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, ज्याला पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. त्याची किंमत दिल्ली-एनसीआरमध्ये 72,000 रुपयांपासून सुरू होते.