Take a fresh look at your lifestyle.

Relationship Tips : सकाळी उठल्याबरोबर पार्टनर सोबत करा ‘हे’ काम ; दिवसभर मूड राहील फ्रेश !

शेतीशिवार टीम,16 डिसेंबर 2021 :- कोणत्याही नात्यात प्रेम, कम्युनिकेशन, एकमेकांचा समजपणा आणि नाविन्य असणे खूप गरजेचं असतं .पण कधी-कधी एकमेकांसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्याने पती-पत्नीचे किंवा प्रेयसी-प्रेयसीचे आयुष्य खूप बोरिंग आणि थकून गेल्यासारखं वाटतं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात रोमान्स आणि क्रेझ टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही सकाळी उठून तुमच्या पार्टनरचे लाड करावे, कारण तुमच्या दिवसाची सुरुवात रोमँटिक पद्धतीने झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो आणि पती-पत्नीच्या नात्यात गोडवा टिकून राहतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सकाळी झोपेतून उठल्यानंतर कराव्यात…

एकमेकांना प्रेमाने शुभ सकाळच्या शुभेच्छा द्या :-

तुमच्या दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी, तुमच्या पार्टनरला मिठी(Hug) मारून किंवा चुंबन (Kiss) घेऊन शुभ सकाळची शुभेच्छा द्या. असे केल्याने तुमच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईलच पण तुमच्यात एटीकेट्स डेव्हलप राहील आणि संपूर्ण दिवस आनंदात जाईल.

प्रशंसा करणे थांबवू नका :-

स्त्रियांना त्यांचे कौतुक ऐकायला फार आवडतं.अशा स्थितीत जर तुमच्या पार्टनरने सकाळी तुमची स्तुती (प्रशंसा) केली तर तुमचा दिवस खरोखरच आनंदरम्य होऊन जाईल. म्हणूनच, जेव्हा तुम्ही सकाळी उठता, तेव्हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या पार्टनरचा विश्वास वाढवा आणि त्यांची स्तुती करा.

एकत्र बसा आणि चहाचा आनंद घ्या :-

सकाळच्या धावपळीत अनेकदा असे घडते की पती-पत्नी एकत्र बसून चहा पिऊ शकत नाहीत, एकमेकांना सकाळी वेळ देऊ शकत नाही , परंतु त्यांच्या नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यात प्रणय-प्रेम टिकवून ठेवण्यासाठी सकाळचा चहा एकमेकांसोबत प्या. यामुळे तुमचा मूड फ्रेश राहील आणि तुम्हाला दिवसभर चांगली गपशप देखील बेभावुन जाईल.

दिवसाची सुरुवात हसून-खेळून करा :-

जर तुमच्या दिवसाची सुरुवात हसून-खेळून आणि विनोदाने होत असेल तर संपूर्ण दिवस हसण्यातच जातो. अशा परिस्थितीत तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमच्या पार्टनरला फोनवरून एक गोंडस विनोद सांगू शकता किंवा काही वेळ बसून मजा करू शकता.

सकाळच्या कामात मदत करा :-

महिला सकाळी खूप काम करत असतात. अशा वेळी त्यांना चहा-नाश्त्याची ऑर्डर देण्याऐवजी पुरुषांनी त्यांच्या कामात मदत करावी. कधी पत्नीसाठी स्वतःच चहा-कॉफी बनवा किंवा सुट्टीच्या दिवशी तिच्यासाठी स्वतःच्या हाताने नाश्ता/ ब्रेक फास्ट करा.