Take a fresh look at your lifestyle.

तुमच्या Hero Splendor ला बनवा इलेक्ट्रिक बाईक ; एकदा चार्ज करा अन् पळवा 151 Km ; पहा, किती येईल खर्च ?

शेतीशिवार टीम, 9 जून 2022 : भारतीय फर्म GoGoA1 ने Hero Splendor बाईकसाठी इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट अधिकृतपणे विक्रीसाठी (kit for splendor Electric Conversion) उपलब्ध करून दिलं आहे. कंपनीला एप्रिलमध्ये ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) कडून या किटसाठी मंजुरी मिळाली. या किटद्वारे कोणतीही व्यक्ती हिरो स्प्लेंडर बाइकचे इलेक्ट्रिक बाइकमध्ये रूपांतर करू शकते.

किटमध्ये 2 kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आणि 2.8 kWh क्षमतेची बॅटरी पॅक समाविष्ट आहे. याशिवाय रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिमचाही यात समावेश करण्यात आला आहे.

GoGoA1 चे Hero Spendor इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट भारतात 37,700 रुपयांपासून सुरू होतं, तर बॅटरी पॅक आणि चार्जिंग ॲडॉप्टरची किंमत स्वतंत्रपणे 65,606 रुपये असणार आहे. अशा प्रकारे, संपूर्ण इलेक्ट्रिक किटसाठी एकूण 1,03,306 रुपये (GST न जोडता) भरावे लागतील.

वर नमूद केल्याप्रमाणे, किट 2 kW इलेक्ट्रिक मोटर तसेच 2.8 kWh बॅटरी पॅकसह येते. ही रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम असलेली रियर व्हील हब मोटर आहे. सेटअपमध्ये DC- DC कन्व्हर्टर, नवीन एक्सीलरेटर वायरिंग, कंट्रोलर बॉक्ससह की स्विच आणि नवीन स्विंगआर्मचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, त्याचा बॅटरी पॅक पूर्ण चार्ज केल्यावर 151 किमीची रेंज देऊ शकतो.

भारतातील 36 RTO स्थानांवर GoGoA1 च्या इंस्टॉलेशन वर्कशॉपमध्ये रूपांतरण केलं जाईल. काही किरकोळ कागदपत्रे केल्यानंतर ग्राहक स्थानिक आरटीओमध्ये त्यांच्या बाईक इलेक्ट्रिकमध्ये बदलू शकतात. रूपांतरणानंतर, बाईकसाठी नवीन हिरवी नंबर प्लेट जारी केली जाते, परंतु नंबर तोच राहील.

इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किटची किंमत कमी असली तरी, बॅटरी पॅकच्या दुप्पट किंमत स्वतंत्रपणे संपूर्ण किटची किंमत भारतातील अनेक इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा जास्तचं आहे.

इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट :- https://gogoa1.com/products/gogoa1-17inch-2000w-brushless-hub-motor-kit-for-motorcycle-electric-conversion

बॅटरी पॅक आणि चार्जिंग ॲडॉप्टर :- https://gogoa1.com/products/lithium-ion-battery-pack-72v-40ah-80ah-bms