Take a fresh look at your lifestyle.

महागाई एकदम ओक्के हाय…! 18 जुलैपासून दुग्धजन्य पदार्थांसोबत ‘हे’ सर्वकाही महागणार, हॉस्पिटल रूम, शालेय साहित्यावर ही 18% GST…

शेतीशिवार टीम : 14 जुलै 2022 :- निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 47 वी GST कौन्सिलची बैठक झाली, ज्यामध्ये अनेक खाद्यपदार्थांवर जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा परिणाम असा होईल की, पुढील आठवड्यापासून रोज लागणाऱ्या दुधा सोबत इतरही पदार्थांचे दरही वाढतील. 

नवी दिल्ली.-अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 47 व्या GST बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचा प्रभाव 18 जुलै 2022 पासून दिसून येईल. 18 जुलैपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. आता तुम्हाला दैनंदिन खाद्यपदार्थांसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. या खाद्यपदार्थांमध्ये दुधाचाही समावेश असून, त्याच्या दरातही पुढील आठवड्यापासून वाढ होणार आहे.

GST दर वाढल्यामुळे वस्तूंच्या किमतीत हि वाढ होईल :-

दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमतींचा परिणाम तुमच्या बजेटवर होईल. सर्वसामान्यांना मात्र अद्याप कुठलाही दिलासा मिळणार नसल्यचे दिसते. केवळ खाद्य पदार्थच नाही तर विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जात आहेत.

कमी उत्पन्न आणि वाढत्या खर्चात सामान्य भारतीयांचे घरगुती बजेट कालानुरूप वाढतच चालले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या GST वाढीच्या निर्णयानंतर लोकांना जीवनावश्यक खाद्यपदार्थांसाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळेच पुढील आठवड्यापासून म्हणजेच १८ जुलैपासून काही सेवांच्या किमती वाढतील.

कोणत्या वस्तूंच्या किमती वाढतील ?

18 जुलै 2022 पासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. आतापासून तुम्हाला दैनंदिन खाद्यपदार्थांसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. काही वस्तू आणि सेवांवर जीएसटी दर वाढतील, त्यानंतर पनीर, लस्सी, बटर मिल्क, पॅक केलेले दही, गव्हाचे पीठ, इतर तृणधान्ये, मध, पापड, मांस आणि मासे यांच्या किमती वाढतील.

याशिवाय, मुडी आणि गूळ यांसारख्या प्री-पॅक केलेल्या लेबलांसह कृषी मालाच्या किमतीही 18 जुलैपासून वाढणार आहेत. या उत्पादनांवरील करात वाढ करण्यात आली आहे. सध्या ब्रँडेड आणि पॅक खाद्यपदार्थांवर 5% GST आकारला जातो. अनपॅक आणि लेबल नसलेली उत्पादने करमुक्त आहेत.

18 जुलैपासून काय होणार महाग, पाहा यादी –

टेट्रा पॅक दही, लस्सी आणि बटर मिल्कच्या किमती वाढतील कारण त्यावर 18 जुलै पासून 5% GST आकारला जाणार आहे.

चेकबुक जारी करण्यासाठी बँकेकडून पूर्वी जो सेवा कर आकारला जात होता त्यावर आता 18% जीएसटी लागू होणार आहे.

रूग्णालयातील रु. 5,000 वरील (Non-ICU) खोल्याच्या भाड्यावर 5% जीएसटी आकारला जाईल.

एटलस नकाशांवर देखील 12% दराने GST आकारण्यात येईल.

दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या हॉटेल रूमवर 12 टक्के जीएसटी लागेल.

LED लाईट्स ,LED दिवे यावर 18% GST आकारला जाईल.

ब्लेड, पेपर कटिंग कात्री, पेन्सिल, शार्पनर, चमचे, काटे, स्किमर आणि केक सर्व्हरवरील जीएसटी 18% पर्यंत वाढला आहे.

छपाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईची किंमत वाढणार

चिट फंड सेवेवरील GST दर 12 वरून 18 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

पाण्याचे पंप, सायकल पंपही महागणार

पिठाची गिरणी, डाळ यंत्राच्या दरात वाढ होणार, धान्य वर्गीकरण मशिन, डेअरी मशिन, कृषी उत्पादन यंत्रे महागणार…

ड्रॉइंग आणि मार्किंग उपकरणांची किंमत देखील वाढेल.

सोलर वॉटर हिटरवरील GST 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यां पर्यंत वाढणार

कोणत्या वस्तूत मिळू शकतो दिलासा :-

ऑर्थोपेडिक्स उपचारांच्या वस्तूंवरील GST दर 12 वरून 5 टक्क्यांपर्यंत घटवला आहे.

अँटी-फायलेरिया औषधाची किंमत जुन्या दरावरच राहणार आहे.

लष्करी उत्पादनांवरील IGST चा दर शून्य करण्यात आला आहे.

तेलासह ट्रक मालवाहतुकीचे दर 18 वरून 12% करण्यात आले आहेत.

रोप – वे मालवाहतूक आणि प्रवासावरील GST 18 वरून 5 टक्क्यांवर आणला आहे.