Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : राज्य सरकारचा अवघ्या 14 तासात यूटर्न, ब्यूटी पार्लर आणि जीमसाठी नवे नियम, जाणून घ्या…

शेतीशिवार टीम, 9 जानेवारी 2022 : आज रात्री 10 जानेवारीपासून लागू होणार्‍या निर्बंधांच्या पहिल्या आदेशात राज्य सरकारने रविवारी बदल केला. राज्य सरकारने आता ब्युटी सलून आणि जीमसाठी 50% क्षमतेने चालवण्यास परवानगी दिली आहे. या आधी सरकारने शनिवारी अधिसूचना जारी करून सर्व ब्युटी सलून, स्पा आणि जिम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

सरकारने केवळ सलूनला 50% सूट देऊन चालवण्याची परवानगी दिली होती. एका दिवसानंतर, रविवारी, सरकारने ब्युटी पार्लर आणि जिमला अटी आणि शर्थींसह ऑपरेट करण्याची परवानगी असलेल्या संस्थांच्या श्रेणीमध्ये ठेवण्याच्या आपल्या आदेशात बदल केला. सरकारने स्पष्ट केलं आहे की, केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना जिम आणि ब्युटी पार्लरमध्ये परवानगी देण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सकाळी 5 वाजता रात्री 11 वाजता नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या कर्फ्यूशिवाय, सरकारने इतर अनेक निर्बंध लादले आहेत. राज्य सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवली आहेत. शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट्स सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत 50% क्षमतेने चालू राहणार आहे.

जाणून घ्या नवी सुधारित नियमावली….

रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी
दिवसा जमावबंदी लागू. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव
अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध

शासकीय कार्यालयात प्रवेश बंद आवश्यकता असल्यास मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक
खासगी कार्यालये 50 टक्के कर्मचारी मर्यादा, दोन्ही डोस घेतलेल्यांना हजेरीस परवानगी, इतरांना वर्क फ्रॉम होम
लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी

अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

हेअर कटिंगची दुकाने, ब्युटी सलून आणि जीम 50 टक्के क्षमतेने सुरू, रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार
पर्यटनस्थळे बंद, पार्क, प्राणिसंग्रहालय, गड-किल्ले, म्युझियम, एंटरटेनमेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
शॉपिंग मॉल आणि बाजारपेठा, बाजार संकुले 50 टक्के क्षमतेने सुरू

रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू, पण रात्री 10 पर्यंत परवानगी. होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे
नाट्यगृहे, सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी.

नाट्यगृहे, सिनेमागृहांत संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी, मात्र रात्री 10 ते सकाळी 8 नाट्यगृहे-सिनेमागृहे बंद
सार्वजनिक वाहतुकीसाठी लसीचे दोन डोस आवश्यक.