Take a fresh look at your lifestyle.

हिवाळ्यात फिट राहायचं असेल तर आयुर्वेदाने सांगितलेल्या ‘या’ 4 गोष्टी रोज खा…

शेतीशिवार टीम,17 डिसेंबर 2021:- हिवाळा हंगाम सध्या खूपच जोमात आहे. या ऋतूमध्ये आजारांपासून दूर राहण्यासाठी आहार तसेच जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी काही गोष्टींचा आहारात समावेश करणे खूप महत्वाचे आहे, तसेच काही गोष्टींपासून अंतर राखणे देखील आवश्यक आहे.

आजकाल लोकांचा कल निरोगी राहण्यासाठी लोकं आयुर्वेदाच्या सल्ल्याकडे वळत आहे. आयुर्वेदात आपण शरीरातील दोषांबद्दल बोलतो तर प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या तापमानावर असते. वात, पित्त आणि कफ या तीन प्रकारच्या ऊर्जाने ते बनलेले आहे.

आपल्या सर्वांमध्ये या तीन ऊर्जा आहेत आणि त्यांचे संतुलन बिघडले की लगेच माणूस आजारी पडतो.आयुर्वेदात आहाराला खूप मोठे प्राधान्य दिले आहे. जर तुमचा आहार चुकीचा असेल तर औषधे देखील काम करणार नाहीत, अन्न योग्य असेल तर औषधांची गरज पडणार नाही. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात काय खावे हे जाणून घ्या…

चला तर मग जाणून घेऊया सविस्तर :-

आले :-

आयुर्वेदात ‘आले’ ला औषध मानले गेले आहे . हे भारतीय जेवणात चव वाढवणारा मसाला म्हणून काम करते. हिवाळ्यात आपण चहापासून ते जेवणापर्यंत आले वापरू शकतो. हिवाळ्यात, कोणत्याही प्रकारे आपल्या जेवणात आल्याचा समावेश करा. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.याउलट महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान वेदना होत असतील तर त्यामुळे आराम मिळतो.

गावरान तूप :-

हिवाळ्यात आपण इतके ऍक्टिव्ह नसतो. त्यामुळे पचनशक्ती कमजोर होऊ लागते. या शक्तीची तीव्रता टिकवण्यासाठी तूप आणि नैसर्गिक तेलांचा आहारात समावेश करावा. या ऋतूत तूप किंवा पांढरे लोणी खूप फायदेशीर आहे.

सूप आणि शिजवलेलं अन्न :-

हिवाळ्यात भरपूर भाज्या येतात. त्यांना शिजवा आणि त्याच सूप प्या. हे तुम्हाला उबदार ठेवेल, प्रतिकारशक्ती मजबूत ठेवेल आणि डिहाइड्रेशन होऊ देणार नाही. हिवाळ्यात गरम जेवण आरामासोबतच फायदेशीर आहे.

काजू :-

हिवाळ्यात काही ड्रायफ्रुट्स आणि नट्सचा आहारात नक्कीच समावेश करा. ते तुम्हाला फक्त उबदार ठेवत नाहीत तर ऊर्जा देखील देतील. काजू, अक्रोड, पिस्ता, खजूर, बदाम, काहीही खाऊ शकता. बाकी काही नाही तर फराळ म्हणून शेंगदाणे नक्की खा.