Take a fresh look at your lifestyle.

महिंद्रा XUV300 न्यू पॉवरफुल शैलीत लॉन्च ; फक्त 7 सेकंदात गाठणार 100 चा आकडा, किंमतही स्वस्त, पहा, जबरदस्त लूक !

शेतीशिवार टीम : 9 ऑक्टोबर 2022 :- महिंद्राने आपले न्यू XUV300 चे न्यू टर्बोस्पोर्ट मॉडेल देशांतर्गत बाजारात लॉन्च केलं आहे. कंपनीचा दावा आहे की, हे न्यू मॉडेल पूर्वीपेक्षा अधिक पॉवरफुल आहे, आणि या XUV300 ची किंमत 10.35 लाख ते 12.90 लाख रुपये (Ex-showroom) निश्चित करण्यात आली आहे. 1.2-लिटर mStallion TGDi इंजिन यूज करणारी ही कंपनीची पहिली SUV आहे, जी केवळ 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. कंपनीने हे मॉडेल न्यू व्हेरियंट 3 ट्रिममध्ये सादर केलं आहे, ज्यामध्ये W6, W8 आणि W8(O) व्हेरियंट आहेत. त्याचे नवीन इंजिन केवळ SUV ची इफिशियन्सी सुधारत नाही तर तिचे मायलेज देखील चांगलं आहे.

या सेगमेंट मधलं सर्वात पॉवरफुल इंजिन :-     

कंपनीचा दावा आहे की, ही SUV अधिक पॉवरफुल इंजिनसह येते, तिचे इंजिन 130hp पॉवर आणि 230Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीने हे 3-सिलेंडर इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह जोडलं आहे. सध्याच्या टर्बो इंजिनच्या तुलनेत हे नवीन इंजिन गॅसोलीन डायरेक्ट इंजेक्शन टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, ही टेक्नॉलॉजी केवळ इंजिनची इफिशियन्सी सुधारत नाही तर मायलेज देखील सुधारते. पिक-अपच्या बाबतीतही, ही SUV आत्तापर्यंतची सर्वात बेस्ट आहे, महिंद्राचं म्हणणं आहे की, न्यू XUV300 टर्बोस्पोर्ट फक्त 7 सेकंदात 0 ते 100 Kmph वेग वाढवते.

न्यू XUV300 ला मायलेज आणखी सुधारण्यासाठी आणि CO2 उत्सर्जन कमी करण्यासाठी माईल्ड-हायब्रिड स्टार्ट-स्टॉप सिस्टम देखील मिळतं आणि महिंद्राचा दावा आहे की, हे नवीन इंजिन SUV ला 18.2 kmpl पर्यंत मायलेज देतं. न्यू इंजिन जुन्या 110hp, 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल युनिटपेक्षा 20hp आणि 30Nm अधिक टॉर्क निर्माण करतं, जे XUV300 ला सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल कॉम्पॅक्ट SUV बनवते. याशिवाय, दोन्ही टर्बो-पेट्रोल इंजिन देखील 115hp, 1.5-लीटर डिझेल इंजिनसह उपलब्ध असणार आहे.

डिझाइन बद्दल बोलायचं झालं तर, समोर लाल इन्सर्टसह नवीन ग्लॉस ब्लॅक ग्रिल आहे, तर फ्रंट बंपरवरील सेंट्रल एअर इनटेक देखील क्रोम एलिमेंट्सने सजवलेलं आहे. याला महिंद्राचा न्यू ट्विन पीक्स लोगो आणि ब्लॅक आऊट विंग मिरर देखील मिळतात, जे याला जबरदस्त न्यू लुक देतात. महिंद्राने ही SUV एकूण 4 कलरमध्ये लॉन्च केली आहे ज्यात ब्लॅक रूफसह ड्युअल-टोन ब्राँझ, ब्लॅक रूफसह व्हाईट आणि व्हाईट रूफसह ब्लॅक, तसेच मोनोटोन ऑप्शनसह ब्राँझ यांचा समावेश आहे.

SUV मध्ये, कंपनीने ड्युअल-टोन ब्लॅक आणि बेज इंटीरियर थीमला ऑल-ब्लॅक थीमसह बदललं आहे जे डॅशबोर्ड, सेंटर कन्सोल आणि स्टीयरिंग व्हीलवर सिल्व्हर अँक्सेंटसह कॉन्ट्रास्टसह येते. यात न्यू क्रोम फिनिश्ड पेडल्स देखील मिळतात. न्यू XUV300 च्या टॉप-स्पेक W8 (O) ट्रिममधील फीचर्समध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, LED डेटाइम रनिंग लॅम्पसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, 16-इंच अलॉयज, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मीट अप यांचा समावेश आहे.

याशिवाय, ऑटो हेडलॅम्प आणि व्हायपर्स आणि लेदरेट अपहोल्स्ट्री या SUV ला आणखी चांगली बनवतात. सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्ज, फ्रंट आणि बॅक पार्किंग सेन्सर, ऑल-व्हील डिस्क ब्रेक आणि हिल स्टार्ट असिस्टसह ESP यांचा समावेश आहे.