Take a fresh look at your lifestyle.

लॉन्च होताच मार्केटमध्ये ‘या’ 7 सीटर MPV चा धुमाकूळ | 36 ते 40 आठवड्यांपर्यंत व्हेटिंग पिरियड…

शेतीशिवार टीम : 31 मार्च 2022 : पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे अलीकडच्या काही महिन्यांत सीएनजी (CNG) कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. पट्रोल आणि डिझेल च्या दरानेही आज शंभरी ओलांडली आहे. मुंबईत आज पेट्रोल 115.88 तर डिझेल 100.10 पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या महागाईच्या काळात सध्या अशा सीएनजी CNG वाहनांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी वाढली आहे. 

तसेच या वाढत्या महागाईच्या काळात महाराष्ट्र सरकाने दिलासा देत CNG वरील VAT 13.5% वरून 3% करण्याचा निर्णय घेतल्याने आता CNG च्या दारात प्रति किलो 5.75 ते 8.00 रुपयापर्यंत कपात होणार आहे.

अशा वेळी आपण एका अशाच CNG कार बद्दल जाणून घेणार आहोत, त्याची लोकप्रियता इतकी आहे की त्याचा व्हेटिंग पिरियडही 36 ते 40 आठवड्यांपर्यंत पोहोचला आहे. खरं तर, आपण मारुती अर्टिगा (Maruti Ertiga) CNG बद्दल जाणून घेत आहोत…

मारुतीने हे लोकप्रिय Ertiga CNG मॉडेल जुलै 2019 मध्ये लाँच केलं आहे. तेव्हापासून, CNG वाहन म्हणून त्याची कमी किंमत आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे लोक तिला खरेदी करणे पसंत करत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे अलीकडील दोन महिन्यात या MPV ची म्हणजे जानेवारी 2022 मध्ये 11847 युनिट्स आणि फेब्रुवारीमध्ये 11649 युनिट्सची विक्री झाली आहे. आपण Maruti Ertiga CNG बद्दल डिटेल्स जाणून घेऊयात, जसे की, फीचर्स / इंजिन / किंमत / EMI बद्दल..

कशी आहे, Maruti Ertiga CNG

मारुती सुझुकीची प्रसिद्ध MPV कार Ertiga देखील CNG किटसह येते. कंपनीने या कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन वापरलं आहे. त्याचे CNG व्हेरियंट 92PS पॉवर आणि 122Nm टॉर्क जनरेट करतं. हे CNG व्हेरियंट फक्त VXI मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 7-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, एलईडी टेल लॅम्प, फॉग लॅम्प, प्रोजेक्टर हेडलॅम्प, व्हेंटिलेटेड फ्रंट कप होल्डर, ऑटो क्लायमेट कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), मागील सीटसाठी एसी व्हेंट्स आहेत. आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. या कारमध्ये 60 लिटर क्षमतेची सीएनजी (CNG) इंधन टाकी आहे.

Maruti Ertiga CNG Price :-

मारुती एर्टिगा पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 7.81 लाख रुपयांपासून सुरू होते, परंतु VXI CNG व्हेरिएंटची किंमत 9.87 लाख रुपये (Ex-showroom) पासून सुरू होते. कंपनीचा दावा आहे की, ही कार 26.08km/kg पर्यंत मायलेज देते.

मारुती अर्टिगा CNG EMI :-

Maruti Ertiga CNG VXI ची किंमत 9.87 लाख रुपये(Ex-showroom) पासून सुरू होते, जर तुम्ही मारुती अर्टिगा CNG VXI ची किंमत पाहिली तर. जर तुम्ही त्यासाठी 1 लाख रुपये डाऊन पेमेंट केले, तर कार देखो EMI कॅल्क्युलेटरनुसार त्याची EMI 9.8 व्याज दर आणि 5 वर्षांच्या कर्जासह प्रति महिना 21113 रुपये असणार आहे. मारुती एर्टिगाच्या CNG मॉडेलला वित्तपुरवठा केल्यावर, तुम्हाला 5 वर्षांत सुमारे 2,68,480 लाख रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे.

Maruti Ertiga CNG वर उपलब्ध असलेले कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदर देखील तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून असतात. तुम्ही तुमच्या बँकिंग किंवा CIBIL स्कोअरमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट दिल्यास, बँक त्यानुसार या तिन्हींमध्ये बदल करू शकते.