Take a fresh look at your lifestyle.

पुणे : नितीन गडकरींनी लॉन्च केली 857Km रेंज अन् 9 एअरबॅगवाली Electric Car, अवघ्या 31 मिनिटांत होणार फुल चार्ज ; पहा, किंमत अन् फीचर्स

आज इलेक्ट्रिक व्हीकल सेगमेंटमध्ये आणखी एक न्यू प्लेयरची एंट्री झाली आहे. जर्मनीतील प्रमुख लक्झरी व्हीकल निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz) आज भारतीय बाजारपेठेत पहिली मेक-इन-इंडिया मर्सिडीज-बेंझ EQS 580 इलेक्ट्रिक सॅलून कार लॉन्च केली.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कारचे लोकार्पण करण्यात आलं. आकर्षक लुक आणि पॉवरफुल बॅटरी पॅकने सुसज्ज असलेल्या या कारची स्टार्टींग प्राईस 1.55 कोटी रुपये (Ex-showroom) निश्चित करण्यात आली आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की, कारची किंमत खूप जास्त आहे, तर तुम्ही एकदा तिचे फीचर्स आणि टेक्नॉलॉजी तर पहा. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जमध्ये 857Km पर्यंतचे अंतर कापू शकते.

कंपनी या कारचे महाराष्ट्रातील पुणे येथील प्लांटमध्ये असेंबल करत आहे. कंपनीच्या EQS रेंजमधील ही दुसरी कार आहे जी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली गेली आहे, याआधी कंपनीने AMG EQS लाँच केली होती. ईव्ही-ओन्ली इलेक्ट्रिक व्हेईकल आर्किटेक्चर (EVA2) प्लॅटफॉर्म बेस्ड, कार एक कॅब-फॉरवर्ड डिझाइन दिलं गेलं आहे, ज्यामध्ये एक लांब आणि कर्व रूफलाइन आहे, ज्याला ‘वन बो’ म्हणूनही ओळखलं जातं. याशिवाय, याला आणखी सुंदर बनवण्यासाठी फ्रंटला फुल विड्थ एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (DRL) आणि बॅक साईडला 3डी हेलिक्स टेललाइट्स लाइट स्ट्रिप मिळतात. कंपनीने याला 20-इंच अलॉय व्हीलसह पाच वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केलं आहे.

Car चे इंटेरियर पाहून दिवाने व्हाल 

मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) नेहमीच त्याच्या विशेष टेक्नॉलॉजी आणि फीचर्ससाठी ओळखली जाते, कंपनीने या Car मध्ये देखील बरेच चेंजेस केले आहे. या कारचे इंटीरियर कोणाचेही मन जिंकण्यासाठी पुरेसे आहे. आतील भागात ड्युअल-टोन नेवा ग्रे / बालाओ ब्राउन व मॅकियाटो बेज/स्पेस ग्रे थीमचा वापर ब्राऊन वॉलनट ट्रिमसह होतो.

केबिनचे फीचर्स म्हणजे, 56-इंच सिंगल-पीस MBUX हायपरस्क्रीन याला तीन OLED स्क्रीन मिळतात : 12.3-इंच ड्रायव्हर डिस्प्ले, 17.7 – इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, तर 12.3-इंच फ्रंट पॅसेंजर टचस्क्रीन सिस्टम डॅशबोर्ड आणि केबिनमध्ये वेगळंच रूप देतं.

मोटर, बॅटरी रेंज आणि परफॉर्मन्स :-

EQS 580 मध्ये, कंपनीने दोन सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर्स आणि 107.8kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरला आहे, त्याचा ड्युअल-मोटर सेटअप 516bhp ची पॉवरफुल पॉवर आणि 855Nm टॉर्क जनरेट करतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कार ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने प्रमाणित केलेल्या 857 किमी (ARAI) च्या ड्रायव्हिंग रेंजसह येते, म्हणजेच एका चार्जमध्ये ही कार दिल्ली ते भोपाळ असा प्रवास करू शकते. कंपनीचा दावा आहे की, त्याचा टॉप स्पीड 210 Km/h आहे आणि त्याची बॅटरी 200kW चार्जरने केवळ 31 मिनिटांत 10 ते 80% चार्ज होऊ शकते.

हे आहेत कमालीचे फीचर्स :-

Mercedes-Benz ने EQS 580 4Matic ला रियर-एक्सल स्टीयरिंग, फ्रंट मसाज सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, हेड्स-अप डिस्प्ले, अँम्बियंट लाइटिंग, MBUX रीअर-सीट टॅबलेट, वायरलेस फोन चार्जिंग पॅड (फ्रंट आणि रियर) यांसारख्या उत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज केलं आहे. बर्मेस्टर साउंड सिस्टम, डिजिटल एलईडी हेडलाइट्स, सेमी-एक्टिव्ह सस्पेन्शनसह एअरमॅटिक ड्युअल-कंट्रोल आणि वेंटिलेशन आणि हीटिंग फंक्शन्ससह पॉवर फ्रंट आणि रियर सीट. सेफ्टीच्या दृष्टीने, यात 9 एअरबॅग्ज, ड्रायव्हर असिस्टन्स पॅकेज प्लस, अँक्टिव्ह स्टीयरिंग असिस्ट, लेन कीपिंग असिस्ट, अँक्टिव्ह पार्किंग असिस्ट प्री-सेफ इम्पल्स यांसारखे फीचर्स मिळतात.