Take a fresh look at your lifestyle.

या इलेक्ट्रिक Car पुढे Nexon EV सुद्धा फेल ! 12 लाखांत मिळणार तब्बल 400Km रेंज, परफॉमन्सही तगडा अन् सेफ्टीचीही गॅरंटी..

Tiago EV, Tigor EV आणि Nexon EV सह टाटा मोटर्सने भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये चांगली पकड मिळवली आहे. यामुळेच टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारची सर्वाधिक विक्री होत आहे. Tata Motors ने गेल्या वर्षी (2023) देशात 69,173 इलेक्ट्रिक कारची विक्री केली. आता कंपनी लवकरच आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. टाटा मोटर्सची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे जी पूर्णपणे डेडिकेटड ईव्ही प्लॅटफॉर्मवर बनवली आहे. यामुळे, यात बिग बॅटरी आणि चांगली रेंज असणार आहे.

टाटा कंपनी 17 जानेवारीला भारतीय बाजारात पंच EV लाँच करणार असून 5 जानेवारीपासून बुकिंग सुरू झालं आहे. तुम्हीही ही गाडी खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही 21,000 रुपये टोकन रक्कम जमा करून स्वतःसाठी युनिट बुक करू शकता. लॉन्चच्या पार्श्वभूमीवर, पंच EV देशातील अनेक डीलरशिपवर उपलब्धही झाली आहे.

डिझाइन नेक्सॉन ईव्ही सारखचं..

टाटा मोटर्सने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर पंच EV चे मॉडेल फोटोज देखील जारी केली आहेत, ज्यामध्ये त्याचा पुढील भाग पूर्णपणे Nexon EV सारखा दिसत आहे. Nexon EV प्रमाणेच त्याच्या बोनेट लाइनवर LED स्ट्रिप देण्यात आली आहे. EV चा चार्जिंग पोर्ट लाईट बारच्या खाली दिलेला आहे. तसेच, यात स्प्लिट एलईडी हेडलॅम्प सेटअप, वर्टिकल स्लॅट – पॅटर्न असलेली लोअर ग्रिल आणि सिल्व्हर फॉक्स स्किड प्लेट देखील मिळते..

पंच EV चे बॅक प्रोफाईल या SUV च्या पेट्रोल व्हर्जन सारखे आहे. यात Y – आकाराचे LED टेललाइट्स, वॉशरसह मागील वायपर, हाय – माउंट स्टॉप लॅम्प, शार्क – फिन अँटेना आणि सिल्वर फॉक्स स्किड प्लेट डिझाइन केलेला मागील बंपर यांचा समावेश आहे.

इंटेरियरमध्ये नवे फीचर्स..

पंच ईव्हीच्या इंटेरियरमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. यात 10.25 – इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह ट्विन – स्पोक स्टीयरिंग व्हील,रिडिझाईन केलेले HVAC पॅनेल, वायरलेस चार्जर, ऑटो – डिमिंग IRVM, सनरूफ, 360 – डिग्री सराउंड कॅमेरा आणि ऑल – डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात येणार आहे. हे सर्व फीचर्स टाटा नेक्सॉन EV मध्ये आधीच उपलब्ध आहेत..

400 किलोमीटरची मिळणार मजबूत रेंज..

कंपनी पंच EV दोन बॅटरी ऑप्शनमध्ये लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. यात स्टॅंडर्ड बॅटरी पॅक आणि एक्सटेंडेड व्हर्जन असेल. त्याच्या एक्सटेंडेड व्हर्जनची ड्राइव्ह रेंज 400 किलोमीटर असणे अपेक्षित आहे. या कारमध्ये ब्रेक रीजनरेशन मोड देखील उपलब्ध असेल, ज्यामुळे कार चालवताना बॅटरी चार्ज होत राहील..

किती असणार किंमत..

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, पंच EV 12 – 14 लाख रुपयांच्या किंमतीच्या रेंजमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. या किमतीत ती Nexon EV पेक्षा 3 लाख रुपये स्वस्त असू शकते. पंच EV अशा लोकांना जास्त आवडेल ज्यांना 15 – 16 लाख रुपये खर्च न करता कमी किमतीत चांगल्या रेंजची कॉम्पॅक्ट SUV खरेदी करायची आहे..