Take a fresh look at your lifestyle.

SuperHit SIP: दरमहा फक्त 5 हजारांची बचत करा, फक्त व्याजाचेच तुम्हाला 7.50 लाख मिळतील, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन..

सध्याच्या काळात SIP हाच गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जात आहे. आर्थिक तज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीने दीर्घ कालावधीसाठी दरमहा ठराविक रक्कम जमा करणे ही काळाची गरज आहे. यात मिळणाऱ्या चक्रवाढ लाभामुळे, दीर्घ कालावधीसाठी एक ठराविक रक्कम तुमच्यासाठी मोठी बचत निधी तयार करते.

निवृत्ती, घर खरेदी, कार खरेदी, मुलांचे शिक्षण यासह तुमची मोठी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्ही या निधीचा वापर करू शकता. गुंतवणूकदारांना देखील ही गोष्ट चांगलीच समजली आहे, त्यामुळे डिसेंबर महिन्यात एसआयपीचा आकडा प्रथमच 13,500 कोटींच्या पुढे गेल्याचे दिसून आले आहे.

कंपाउंडिंगमुळे एसआयपीची क्रेझ..

SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कंपाउंडिंग. याशिवाय यामध्ये कमी पैशातही चांगली गुंतवणूक सुरू करता येते. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करताना महागाईचाही विचार करावा लागतो. याशिवाय या कालावधीमध्ये रुपयाचे मूल्यही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्या मदतीने तुम्ही मोठी स्वप्ने पूर्ण करू शकता.

याशिवाय, याचा तुम्ही आपत्कालीन निधी म्हणूनही वापर करू शकता. गुंतवणुकीची ही पद्धतही अत्यंत सोपी आहे. 5000 रुपयांच्या SIP सह तुम्ही पुढील काही वर्षांत लाखो रुपयांचा निधी तयार करू शकता. शिवाय कंपाउंडिंगचा योग्य फायदा घ्यायचा असेल, तर गुंतवणूक लवकर सुरू करावी लागेल.

6 वर्षात 5 लाख निधीची तरतूद

समजा तुम्ही म्युच्युअल फंडात 5000 रुपयांची एसआयपी सुरू केली आणि तुमचा सरासरी परतावा 12% आहे जो नॉर्मल आहे. याहिशोबाने 6 वर्षांनंतर तुमचा एकूण निधी 5.28 लाख रुपये इतका होईल. यामध्ये 5 वर्षात तुमची एकूण ठेव रक्कम 3.6 लाख रुपये इतकी असेल. अश्याप्रकारे तुम्हाला एकूण सुमारे 1.68 लाख रुपये परतावा मिळेल.

आणखी 3 वर्षांसाठी एसआयपी वाढवल्यास होईल असा लाभ..

जर तुम्ही हीच SIP पुढील 3 वर्षांसाठी चालू ठेवली तर तुमचा एकूण निधी सुमारे 10 लाख रुपयांपर्यंत पोहचेल. त्यामुळे अश्याप्रकारे 9 वर्षात तुमची एकूण ठेव रक्कम 5.4 लाख रुपये असणार आहे. तर यामध्ये एकूण परतावा 4.35 लाख रुपये मिळेल. यासर्वांचा विचार करता एकूण परतावा 9.75 लाख रुपये होईल.

तुम्ही हीच गुंतवणूक अजूनही 3 वर्षे चालू ठेवली, तर तुमचा एकूण परतावा रु. 16 लाखांपेक्षा जास्त होईल. या 12 वर्षांमध्ये तुमची एकूण ठेव रक्कम 7.2 लाख रुपयांपर्यंत पोहचेल. या एसआयपी मध्ये एकूण परतावा 8.92 लाख रुपये असणार आहे.

या एसआयपीची एकूण किंमत 16.11 लाख रुपयांवर जाईल. वरील गोष्टींवरून हे स्पष्ट होते की एसआयपी जास्त असेल तर कंपाउंडिंगचा अधिक फायदा होईल. यामुळेच शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा, जेणेकरून तुम्हाला कंपाउंडिंगचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल.