Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! तमिळ अभिनेता Vikram ला हृदयविकाराचा तीव्र झटका…

शेतीशिवार टीम : 8 जुलै 2022 :- साऊथ सिनेमातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तमिळ अभिनेता विक्रमला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून उपचारासाठी डॉक्टरांची स्पेशल टीम दाखल झाली आहे. त्याच्यावर कावेरी रुग्णालयात उपचार सुरु आहे.  

विक्रमच्या मित्राकडून मिळालेल्या माहितीवरून, विक्रमवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. डॉक्टर त्यांची काळजी असून अभिनेता लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत…

इव्हेंटमध्ये टीझर लॉंच करण्याआधीच आला हार्ट अटॅक…

वृत्तानुसार, अभिनेता विक्रम आज 8 जुलै रोजी त्याचा आगामी चित्रपट ‘पोनियिन सेल्वन पार्ट 1’ च्या टीझर लाँचला उपस्थित राहणार होता, त्या आधीच त्याच्यावर ही अनर्थ वेळ आली.

या चित्रपटात विक्रम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या एपिक ड्रामा चित्रपटाचे दोन भाग आहेत. या चित्रपटातून ऐश्वर्या राय बच्चन चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मणिरत्नम यांनी चित्रपटाचे लेखन केलं आहे. यासोबतच त्याने दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे.

विक्रम 56 वर्षांचा आहे. या आधी विक्रम ‘महान’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. अभिनेत्याने त्याचा मुलगा ध्रुव विक्रमसोबत स्क्रीन शेअर केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक सुबराज यांनी केलं होतं. विक्रमचा हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विक्रमने तमिळ, तेलगू आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये अभिनय केला आहे. 2004 मध्ये विक्रमला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय विक्रमला सात फिल्मफेअर पुरस्कार, तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि तामिळनाडू सरकारचा कलईमामणी पुरस्कारही मिळाला आहे.

1990 मध्ये विक्रमने अभिनय जगतात प्रवेश केला. ‘सेतू’ चित्रपटाने तो खूप प्रसिद्ध झाला. या चित्रपटासाठी विक्रमने 20 किलो वजन कमी केलं होतं. . ‘सेतू’ नंतर विक्रमने ‘जेमिनी’, ‘सामुराई’, ‘धुल’, ‘कधल सदुगुडू’, ‘सामी’, ‘पिथामगन’, ‘अरुल’, ‘अन्नियां’, ‘भीमा’, ‘रावणन’,’दिवा थिरुमगल’, ‘डेव्हिड’, ‘इरु मुगन’ आणि ‘महान’ यासह अनेक हिट.चित्रपट दिले आहे.