Take a fresh look at your lifestyle.

भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार ; मायलेज तर 20 पेक्षा ही जास्त…

शेतीशिवार टीम : 28 मार्च 2022 : आज आपण भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार बद्दल जाणून घेणार आहोत, त्याची किंमत फक्त रु.4.53 लाख (Ex-showroom) पासून सुरू होते.SUV सेगमेंटमध्ये अशी महागडी वाहने लाँच होत असताना, 7 सीटर वाहनाची गरज आजही कायम आहे.

ग्राहक अजूनही त्यांच्या मोठ्या कुटुंबासाठी आणि व्यावसायिक वापरासाठी 7 सीटर वाहने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे, आपण आज याचं सर्वात स्वस्त 7-सीटर वाहनाबद्दल जाणून घेणार आहोत त्याचं नाव आहे Maruti Eeco…

Maruti Eeco ची किंमत 4.53 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.52 रुपये (Ex-showroom) पर्यंत जाते. या वाहनाला लोकांनी अधिक पसंती देत फेब्रुवारी 2022 मध्ये Maruti Eeco चे 9,190 युनिट्स आणि जानेवारी 2022 मध्ये 10,528 युनिट्सची विक्री झाली आहे.

2010 मध्ये लॉन्च झाल्यापासून या 12 वर्षांत लाखो ग्राहकांनी Maruti Eeco विकत घेतली आहे. Maruti Suzuki Eeco मध्ये 1196cc चार सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 73hp आणि 101Nm टॉर्क निर्माण करते, 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सेसशी जोडलेले आहे.

त्यातील इंजिन शक्तिशाली तसेच किफायतशीर असल्याने ग्राहक या वाहनावर आंनदी असल्याचं दिसून येत आहे. Maruti Eeco ही पेट्रोलमध्ये 16.11 km/kg मायलेज देते. तर याशिवाय ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध असून CNG व्हेरियंट मध्ये ती 20.88 km/kg मायलेज देते.

कारच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यात मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर-अ‍ॅडजस्टेबल अ‍ॅक्सटीरियर रियर व्ह्यू मिरर, टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, अलॉय व्हील्स, फॉग लाइट्सपॉवर विंडो, यांसारखे फीचर्स आहेत.

मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco) व्हॅनचे नॉन – कार्गो व्हेरियंट 5 – आणि 7- सीटर अशा दोन्ही ऑप्शनमध्ये ऑफर केलं आहे, मारुती सुझुकी इको च्या बेस व्हेरियंटमध्ये एसी नाही, तर टॉप व्हेरियंटला एसी मिळतो. मारुती सुझुकी ईको 6 रंग ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे – पॅशन रेड, सुपीरियर व्हाइट, मेटॅलिक ब्रीझ ब्लू, सिल्की सिल्व्हर, मेटॅलिक ग्लिस्टनिंग ग्रे आणि मिडनाईट ब्लॅक…