Take a fresh look at your lifestyle.

Electric Scooter : आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त EV स्कुटर, सिंगल चार्जमध्ये 100Km रेंज ; किंमत पाहून लगेच खरेदी कराल, पहा डिटेल्स

शेतीशिवार टीम : 12 ऑगस्ट 2022 :- Raftaar Galaxy Scooter : एकीकडं महागाई तर दुसरीकडं सतत वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे लोक हैराण झाले आहेत, बजेटचा विचार करता आता बहुतांश लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. हे वातावरण पाहता आता मोठ्या कंपन्याही इलेक्ट्रिक (EV) आणि सीएनजी (CNG) वाहनांच्या निर्मितीकडे अधिक लक्ष देत आहेत.

कमी किमती सोबतच इलेक्ट्रिक वाहने खूप चांगल्या मायलेजसाठी देखील ओळखली जातात, मग ती दुचाकी असो किंवा 4 चाकी, आता बहुतेक लोकांची पसंती इलेक्ट्रिक वाहन बनली आहे, आजच्या लेखात आपण तुम्हाला अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याची रेंज देखील मजबूत आहे. आणि फीचर्स सुद्धा कमालीचे…

आकर्षक लुक आणि जास्त रेंज असलेली Galaxy कंपनीची Raftaar Galaxy स्कूटर अतिशय पॉवरफुल आहे, एका चार्जमध्ये 100 Km ची रेंज देते ज्यामध्ये हायटेक फीचर्ससह अनेक आधुनिक फीचर्स आहेत.

आपण जर या स्कुटरच्या किंमतीबद्दल बोललो तर ही स्कूटर कमी किंमतीत उपलब्ध आहे. Raftaar Galaxy इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कंपनीने फक्त 51,900 रुपये ठेवली आहेत.

Raftaar Galaxy इलेक्ट्रिक स्कूटरमधील बॅटरी पॅकबद्दल बोलायचे झाल्यास, यात 64V 30Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. त्यात 250W च्या BLDC टेक्नॉलॉजीची इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे.

सामान्य चार्जरसह, ते 4 ते 5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होते. पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकसह, यात अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर्सचा समावेश आहे.

टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, पुश बटण स्टार्ट, डिजिटल स्पीडोमीटर, एलईडी टेल लाईट, चार्जिंग पॉइंट, डिजिटल ट्रिप मीटर, एलईडी हेड लाइट, अँटी थेफ्ट अलार्म, ईबीएस, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, मोबाइल ॲप्लिकेशन कनेक्टिव्हिटी यांसारखे अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

खरेदी करण्यासाठी व आणखी डिटेल्स पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा