Take a fresh look at your lifestyle.

5 लाखांपेक्षा कमी या 5 जबरदस्त Cars, 32KM पर्यंत मायलेज, पहा फीचर्स अन् किंमत…

शेतीशिवार टीम, 5 एप्रिल 2022 :- एसयूव्ही (SUV) आणि सेडानच्या (Sedan) वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, भारतातील मोठ्या संख्येने लोक अजूनही स्वस्त कारच्या शोधात आहेत. बहुतेक लोक त्यांच पहिलं वाहन म्हणून हॅचबॅकला प्राधान्य देत आहेत. परंतु अशी काही वाहने आकाराने कॉम्पॅक्ट आहेत आणि तुम्हाला परवडणाऱ्या दारातही उपलब्ध आहे. आज आपण 5 लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या 5 Cars बद्दल जाणून घेणार आहोत, यामध्ये मारुतीपासून ह्युंदाई आणि डॅटसनसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) :-

मारुती सुझुकी अल्टो (Alto) ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. याची किंमत 3.85 लाख ते 5.56 लाख रुपये (Ex-showroom) दरम्यान आहे. यात Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह SmartPlay इंफोटेनमेंट सिस्टम, पॉवर विंडो, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखे फीचर्स आहेत. यात 0.8-लीटर पेट्रोल इंजिन मिळतं, जे 48 PS पॉवर आणि 69 Nm टॉर्क जनरेट करतं. ही कार CNG व्हेरियंट मध्ये ही उपलब्ध असून, जी 31.59 km/kg पर्यंतचे प्रभावी मायलेज देते.

डॅटसन रेडी-गो (Datsun redi-Go) :-

2016 मध्ये लॉन्च झाल्यापासून, Datsun redi-GO हे कंपनीचे एंट्री-लेव्हल मॉडेल आहे. याची किंमत 3.83 लाख ते 4.95 लाख रुपये (Ex-showroom) दरम्यान आहे. फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल एअरबॅग्ज, ABD सह ABS, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, पार्किंग कॅमेरा यांसारखे फीचर्स आहेत. हे दोन इंजिन ऑप्शनमध्ये असून एक 0.8-लिटर पेट्रोल इंजिन (54 PS आणि 72 Nm) आणि दुसरे 1.0-लिटर पेट्रोल इंजिन (68 PS आणि 91 Nm) आहे.

मारुती सुझुकी एस प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) :-

मारुतीची ही हॅचबॅक एसयूव्ही (SUV) लूकमध्ये येते. याची किंमत 3.85 लाख ते 5.56 लाख रुपये (Ex-showroom) दरम्यान आहे. याला 180 mm ग्राउंड क्लीयरन्स आणि चारही बाजूने बॉडी क्लेडिंग मिळते. याशिवाय स्मार्टप्ले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि मिनी कूपरसारखा डॅशबोर्ड देण्यात आला आहे. हे 1.0-लिटर पेट्रोल इंजिनसह येते, जे 68 PS पॉवर आणि 90 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार सीएनजी (CNG) ऑप्शन मध्ये ही उपलब्ध आहे.

रेनॉल्ट क्विड (Renault Kwid) :-

Renault ने नुकतेच 2022 Kwid India लाँच केले. याची किंमत 4.49 लाख ते 5.83 लाख रुपये (Ex-showroom) दरम्यान आहे. हे नवीन कलर ऑप्शन आणि अलॉय सारखे फ्लेक्स व्हीलसह सोबर आहे. यात 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, व्हॉइस रेकग्निशन आणि इलेक्ट्रिकली अँडजस्टेबल ORVM सारखे फीचर्स आहेत. हे दोन इंजिन ऑप्शनमध्ये येते, यामध्ये 0.8-लिटर पेट्रोल इंजिन 54 PS आणि 72 Nm आणि 1.1-लिटर पेट्रोल इंजिन 69PS आणि 99Nm पर्यंत टॉर्क जनरेट करतं. ही Car सीएनजी (CNG) ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे…

ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro) :-

Renault Kwid व्यतिरिक्त, मारुती सुझुकीला स्पर्धा करणारी कार Hyundai Setro आहे. त्याची किंमत 4.86 लाख ते 6.44 लाख रुपये आहे. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल बटण, पॉवर विंडो, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखे फीचर्स आहेत. वाहनात 1.1-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 69 PS पॉवर आणि 99 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचा सीएनजी (CNG) ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.