Take a fresh look at your lifestyle.

Mutual Funds : या टॉप 10 म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांना केलं मालामाल ; दिले तब्बल 73% रिटर्न्स !

 

शेतीशिवार टीम,19 डिसेंबर 2021 :- आजच्या या शेअर मार्केटमध्ये वर्षभर जोमात वाढ झाली असली तरी वर्षाच्या अखेरीस त्यात मोठी घसरण झाली आहे. परंतु दुसरीकडे पाहिलं तर, म्युच्युअल फंड योजनांमध्ये जोरदार रिटर्न देखील मिळतो. जर आपण टॉप 10 म्यूचुअल फंड स्कीमवर नजर टाकली तर या योजनांनी 73 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिला आहे. त्याच वेळी, या म्युच्युअल फंड स्कीमने सिप (SIP) माध्यमाद्वारे देखील खूप चांगला रिटर्न्स दिला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर या योजनांमध्ये एसआयपी (SIP) सुरू करता येईल.

जाणून घ्या म्युच्युअल फंडमध्ये कशी असती SIP :-

म्युच्युअल फंडामधील सिस्टमैटिक इन्वेस्टमेंट प्लानला शॉर्ट मध्ये ”SIP” असं म्हणतात. ही एक गुंतवणूकिची पद्धत आहे. हे बँक आणि पोस्ट ऑफिसच्या आरडी सारखे आहे. पण त्यात आणखी अनेक वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये गुंतवणूक वाढवता किंवा कमी करता येते. तर मग हे किती काळ करता येईल ? याशिवाय SIP द्वारे गुंतवणुकीत इतरही अनेक फायदे मिळतात.

चला तर मग जाणून घेऊयात…

टॉप 10 म्युच्युअल फंड स्कीमांची नावे आणि त्यांचे रिटर्न्स जाणून घेऊया.

कोटक स्मॉल कॅप म्यूचुअल फंड स्कीम :-

कोटक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या एका वर्षात एकरकमी गुंतवणूकदारांना 73.48​​% रिटर्न्स दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या म्युच्युअल फंड मध्ये 1 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे एकूण मूल्य 1,73,475 रुपये झाले आहे. त्याच वेळी, या म्युच्युअल फंड स्कीमने एसआयपी ‘SIP’द्वारे केलेल्या गुंतवणुकीवर गेल्या एका वर्षात 56.22 % रिटर्न्स दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या म्युच्युअल फंड स्कीममध्ये महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असेल, तर त्याचे मूल्य 1,51,362 रुपये असेल.

टाटा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीम :-

टाटा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या एका वर्षात एकरकमी गुंतवणूकदारांना 72.33% रिटर्न्स दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने आजपासून 1 वर्षापूर्वी या म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य 1,72,326 रुपये झाले आहे. त्याच वेळी, या म्युच्युअल फंड स्कीमने एसआयपी ‘SIP’द्वारे केलेल्या गुंतवणुकीवर गेल्या एका वर्षात 54.81% रिटर्न परतावा दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या म्युच्युअल फंड स्कीममध्ये महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी ‘SIP’ सुरू केली असेल, तर त्याचे मूल्य 1,50,623 रुपये असेल.

निप्पॉन इंड स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीम :-

निप्पॉन इंड स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या एका वर्षात एकरकमी गुंतवणूकदारांना 71.01% रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी या म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य 1,71,014 रुपये झाले आहे. त्याच वेळी, या म्युच्युअल फंड स्कीमने एसआयपी ‘SIP’ द्वारे केलेल्या गुंतवणुकीवर गेल्या एका वर्षात 56.14 %रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या म्युच्युअल फंड स्कीमध्ये महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी ‘SIP’ सुरू केली असेल, तर त्याचे मूल्य 1,51,319 रुपये असेल.

पीजीआयएम इंड मिडकॅप म्युच्युअल फंड स्कीम :-

पीजीआयएम इंड मिडकॅप म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या एका वर्षात एकरकमी गुंतवणूकदारांना 64.57% रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने आजपासून 1 वर्षापूर्वी या म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य 1,64,575 रुपये झाले आहे. त्याच वेळी, या म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या एका वर्षात एसआयपी ‘SIP’द्वारे केलेल्या गुंतवणुकीवर 49.25 %रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या म्युच्युअल फंड स्कीमध्ये महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी ‘SIP’ सुरू केली असेल, तर त्याचे मूल्य 1,47,698 रुपये असेल.

इन्वेस्को इंड स्मॉलकॅप म्युच्युअल फंड स्कीम :-

इन्वेस्को इंड स्मॉलकॅप म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या एका वर्षात एकरकमी गुंतवणूकदारांना 63.33 %रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या म्युच्युअल फंडमध्ये 1 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य 1,63,328 रुपये झाले आहे. त्याच वेळी, या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या एका वर्षात एसआयपी ‘SIP’ द्वारे केलेल्या गुंतवणुकीवर 47.76 %रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या म्युच्युअल फंड स्कीमध्ये महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी ‘SIP’ सुरू केली असेल, तर त्याचे मूल्य 1,46,906 रुपये असेल.

एक्सिस स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीम :-

एक्सिस स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने गेल्या एका वर्षात एकरकमी गुंतवणूकदारांना 58.66 %%दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या म्युच्युअल फंडात 1 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य 1,58,657 रुपये झाले आहे. त्याच वेळी, या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या एका वर्षात एसआयपी ‘SIP’द्वारे केलेल्या गुंतवणुकीवर 49.91 %रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या म्युच्युअल फंड स्कीमध्ये महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी ‘SIP’ सुरू केली असेल, तर त्याचे मूल्य 1,48,045 रुपये असेल.

महिंद्रा मॅन्युलाइफ मिड कॅप उन्नती स्कीम :-

महिंद्रा मॅन्युलाइफ मिड कॅप उन्नती स्कीमने गेल्या एका वर्षात एकरकमी गुंतवणूकदारांना 51.77 %रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी या म्युच्युअल फूडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य 1,51,775 रुपये झाले आहे. त्याच वेळी, या म्युच्युअल फंड योजनेने एसआयपी ‘SIP’द्वारे केलेल्या गुंतवणुकीवर गेल्या एका वर्षात 35.64 %रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या म्युच्युअल फंड स्कीमध्ये महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी ‘SIP’ सुरू केली असेल, तर त्याचे मूल्य 1,40,383 रुपये असेल.

एडलवाईस मिड कॅप म्युच्युअल फंड स्कीम :-

एडलवाईस मिड कॅप म्युच्युअल फंड योजनेने गेल्या एका वर्षात एकरकमी गुंतवणूकदारांना 50.01 %रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी या म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य 1,50,009 रुपये झाले आहे. त्याच वेळी, या म्युच्युअल फंड योजनेने एसआयपी ‘SIP’ द्वारे केलेल्या गुंतवणुकीवर गेल्या एका वर्षात 36.59 %रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या म्युच्युअल फंड स्कीमध्ये महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी ‘SIP’सुरू केली असेल, तर त्याचे मूल्य 1,40,901 रुपये असेल.

SBI स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीम :-

SBI स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने गेल्या एका वर्षात एकरकमी गुंतवणूकदारांना 48.70 टक्के रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या म्युच्युअल फंडात 1 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य 1,48,699 रुपये झाले आहे. त्याच वेळी, या म्युच्युअल फंड योजनेने एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर गेल्या एका वर्षात 39.59 %रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या म्युच्युअल फंड योजनेत महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असेल, तर त्याचे मूल्य 1,42,527 रुपये असेल.

कोटक इमर्जिंग इक्विटी म्युच्युअल फंड स्कीम : –

कोटक इमर्जिंग इक्विटी म्युच्युअल फंड योजनेने गेल्या एका वर्षात एकरकमी गुंतवणूकदारांना 47.56 टक्के रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या म्युच्युअल फंडात 1 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य 1,47,565 रुपये झाले आहे. त्याच वेळी, या म्युच्युअल फंड योजनेने एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर गेल्या एका वर्षात 34.94 %रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या म्युच्युअल फंड योजनेत महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असेल, तर त्याचे मूल्य 1,40,002 रुपये असेल.