Take a fresh look at your lifestyle.

‘या’ SUV ने अक्षरशः वेड लावलं ; आत्तापर्यंत तब्बल 1.50 लाख बुकिंग, आत्ता बुक केली तर 2 वर्षे वाट पहा…

शेतीशिवार टीम : 23 जुलै 2022 :- महिंद्राची मोस्ट लग्जीरियर आणि प्रीमियम XUV700 ने मार्केट मध्ये धुमाकूळ घातला असून खरेदी करण्यासाठी लोकांनी अक्षरशः वेड लावलं आहे. असं आपण का म्हणतोय तर या SUV ला आत्तापर्यंत विक्रमी 1.50 लाख बुकिंग मिळाले आहेत. महिंद्राने ऑगस्ट 2021 मध्ये XUV700 लाँच केली.तर बुकिंग 7 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झाले.

पहिल्या तासातच या SUVने 25,000 बुकिंग मिळाल्याचा दावा कंपनीने त्यावेळी केला होता. त्याच वेळी, दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा 2 तासात 25,000 बुकिंग मिळालं. म्हणजेच, XUV700 चे 50,000 युनिट्स 3 तासांपेक्षा कमी वेळात बुक केले गेले.

कालांतराने XUV700 मागणी कमी होईल आणि नंतर ती सहज खरेदी करू शकतील असा अनेकांचा विश्वास होता. परंतु असं अजिबात घडलं नाही. या गाडीची तब्बल 22 महिन्यांचा वेटिंग पिरियड सुरू आहे.

देशातील सर्वात जास्त वेटिंग पिरियड असलेली ही SUV देखील आहे. म्हणजेच, बुकिंगच्या 2 वर्षानंतर तुम्हाला त्याची डिलिव्हरी मिळेल. त्याच्या मागणीसह वेटिंग पिरियड देखील वाढत आहे. महिंद्र दर महिन्याला XUV700 चे 8 ते 10 हजार बुकिंग करत आहे. कंपनीने जून 2022 पर्यंत भारतात XUV700 च्या 41,846 युनिट्सची विक्री केली आहे.

Mahindra XUV700 चे फीचर्स :-

XUV700 ला ऑप्शनल ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम देखील मिळते. यात सोनी सराउंड साऊंड सिस्टम, 360-कॅमेरा सेटअप, ड्रायव्हर-साइड नी एअरबॅग, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग, वायरलेस फोन चार्जिंग आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक मिळतात. SUV मध्ये स्काय रूफ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोठ्या पॅनोरामिक सनरूफचा समावेश आहे.

आतील भागात 10.25 – इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि 10.25-इंच ड्रायव्हर डिस्प्लेसह ड्युअल HD स्क्रीन मिळते. साउंड क्वालिटी बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 12 स्पीकरसह 3D साउंड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

महिंद्रा XUV700 इंजिन :-

XUV700 ला दोन इंजिन ऑप्शन आहेत – 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेल. इंजिन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि 6-स्पीड मॅन्युअलशी जोडलेले आहे. त्याचे पेट्रोल इंजिन 200 PS पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, डिझेल इंजिन 185 PS पॉवर आणि 450 Nm पर्यंत टॉर्क देते. डिझेल इंजिनसह तीन ड्राइव्ह मोड “Zip”, “Zap” आणि “Zoom” देखील उपलब्ध आहेत.

महिंद्र XUV700 किंमत :-

Mahindra XUV700 ची एक्स-शोरूम किंमत 13.18 लाख ते 24.58 लाख दरम्यान आहे. हे दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे: MX आणि AX. नंतरचे ट्रिम 3 व्हेरियंटमध्ये विभागले गेले आहे – AX3, AX5 आणि AX7. हे 5 सीटर आणि 7 सीटर ऑप्शनमध्ये येते. विशेष बाब म्हणजे ही SUV ADAS फीचर्ससह येते. यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीपिंग असिस्ट आणि इमरजेंसी ऑटोनॉमस ब्रेकिंगचा समावेश आहे.