Take a fresh look at your lifestyle.

‘या’ 3 स्कूटरचा मार्केटमध्ये धुमाकूळ ; या मॉडेलची विक्री इतकी की, 30 दिवसांत 2 लाख लोकांनी केली खरेदी…

शेतीशिवार टीम : 21 सप्टेंबर 2022 :- टू – व्हीलर कंपन्यांनी ऑगस्टमध्ये विक्रीचे निकाल जाहीर केले आहेत. टॉप 10 सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरची लिस्ट जाहीर झाली आहे. परंतु, या रिपोर्टमध्ये आज देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 3 स्कूटर्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत

सुझुकी ऍक्सेस (Suzuki Access) :-

तुम्हाला देशात 125cc सेगमेंटमध्ये स्कूटरचे अनेक ऑप्शन सहज सापडतील, परंतु Suzuki Access 125 ही एकमेव स्कूटर आहे, जी सर्वाधिक विकली जाते. गेल्या महिन्यात (ऑगस्ट) Suzuki Access ही तिसरी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर ठरली आहे, कंपनीने या स्कूटरच्या एकूण 40,375 युनिट्सची विक्री केली होती, जी मागील वर्षी याच महिन्यात 49,135 युनिट्स होती.

17.83 टक्क्यांच्या वाढीसह व्हॉल्यूममध्ये घट 8,760 युनिट्सवर होती. ही स्कुटर फॅमिली क्लासची पसंती मानली जाते. त्याची एक्स-शोरूम किंमत 77,600 रुपयांपासून सुरू होते.

TVS ज्युपिटर (TVS Jupiter) :-

 

TVS ज्युपिटर ही ऑगस्ट (2022) महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी दुसरी स्कूटर ठरली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने ज्युपिटर स्कूटरच्या 70,075 युनिट्सची विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ती केवळ 45,625 युनिट्सची विक्री करू शकली होती. यावेळी कंपनीला 54.59% नफा झाला आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत रु. 69,571 पासून सुरू होते.

होंडा अँक्टिव्हा (Honda Activa) :-

गेल्या महिन्यात (ऑगस्ट 2022), सर्वाधिक विकलया जाणाऱ्या स्कुटरमध्ये (Honda Activa) पहिल्या क्रमांकावर आहे, कंपनीने गेल्या महिन्यात एकूण 2,21,143 अ‍ॅक्टिव्हाची विक्री केली होती, जी मागील वर्षी विकली 2,04,659 युनिट्स होती. यावेळी कंपनीच्या विक्रीत 8.05% वाढ झाली आहे. अ‍ॅक्टिव्हा स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 72 हजार रुपयांपासून सुरू होते.