Take a fresh look at your lifestyle.

मायलेज…फीचर्स अन् 5 स्टार सेफ्टी ! स्टार्टींग प्राईस फक्त 7.60 लाख रु. असलेल्या ‘या’ 3 SUV ने देशाला वेड लावलं !

शेतीशिवार टीम : 13 सप्टेंबर 2022 : नवी कोरी कार खरेदी करणार्‍यांची टेस्ट गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. लोक Hatchback आणि Sedan ऐवजी स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) वाहनांकडे वळत आहेत. विशेषतः, लोक कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये अधिक रस दाखवत आहेत. ऑगस्ट महिन्यात या तीन SUV वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे, ज्यात मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि ह्युंदाईच्या कारचा समावेश आहे. ही वाहने त्यांच्या उत्कृष्ट मायलेज तसेच अँडव्हान्स फीचर्स आणि सेफ्टीसाठी ओळखली जातात. या SUV कारची स्टार्टींग प्राईस फक्त 7.60 लाख रुपये आहे, चला तर मग जाणून घेऊया या SUV बद्दल…

3) – ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) :-

Hyundai च्या मिड-साईज SUV Creta चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल कंपनीने 2020 मध्ये लॉन्च केलं होतं आणि तेव्हापासून ही SUV चांगलीच पसंत केली जात आहे. एकूण 7 व्हेरियंटमध्ये येणारी, ही SUV नाईट एडिशनमध्येही उपलब्ध आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात कंपनीने एकूण 12,577 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 12,597 युनिट्सची होती. विक्रीच्या आकड्यांमध्ये विशेष फरक नसला तरी या SUV ची मागणी कायम आहे आणि त्यामुळेच ही देशातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे.

Hyundai Creta पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, एक व्हेरियंट 1.5-लीटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लीटर डिझेल आणि 1.4-लिटर टर्बो-पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड DCT (ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक) आणि CVT ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (स्टँडर्ड), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह मिळतात. त्याची किंमत 10.44 लाख ते 18.24 लाख रुपये आहे.

2) – टाटा नेक्सॉन (Tata Nexon) :-

Tata Motors Nexon ही देशातील सर्वात सेफ SUV वाहनांपैकी एक आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये याला 5-स्टार रेटिंग मिळालं आहे. कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एकूण 15,085 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील एकूण 10,006 युनिटच्या तुलनेत पूर्णतः 51% वाढ आहे. या SUV मध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन वापरलं आहे, जे 120PS पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. तर डिझेल वेरिएंटमध्ये 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन मिळते जे 110PS पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते. याचे पेट्रोल व्हेरिएंट 17 किमी आणि डिझेल वेरिएंट 21.5 किमी प्रतिलिटर मायलेज देते.

रेन सेन्सिंग वायपर्स, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 7 इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मागील एसी व्हेंटसह ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या फीचर्सचा समावेश आहे. इतर उत्कृष्ट फीचर्समध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर क्वालिटी डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, ऑटो-डिमिंग IRVM, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि टॉप-स्पेक ट्रिम्सवर ऑफर केलेली 8 – स्पीकर साउंड सिस्टीम यांचा समावेश आहे.

सेफ्टीच्या दृष्टीने, न्यू Nexon ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकरेजने सुसज्ज आहे. त्याची किंमत 7.60 लाख ते 14.08 लाख रुपये आहे.

1) – मारुती ब्रेझा (Maruti Brezza) :-

नवीन मारुती ब्रेझा ही ऑगस्ट महिन्यात देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरली आहे. कंपनीने एकूण 15,193 युनिट्सची विक्री केली आहे जी गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात 12,906 युनिट्सच्या तुलनेत 18% वाढली आहे. कंपनीने या SUV च्या इंजिन मेकॅनिझममध्ये कोणताही बदल केलेला नाही, यात आधीच्या मॉडेलप्रमाणे 1.5 लिटर क्षमतेचे K15C इंजिन वापरले आहे. हे इंजिन स्टॅंडर्ड 5-स्पीड ट्रान्समिशन गियरबॉक्सशी जोडलेलं आहे आणि 103hp च्या पॉवरसह 137Nm टॉर्क जनरेट करते. कंपनी याला 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनसह देखील देत आहे. कंपनीचा दावा आहे की, या SUV चे मॅन्युअल व्हेरिएंट 20.15 kmpl आणि ऑटोमॅटिक वेरिएंट 19.80 kmpl पर्यंत मायलेज देते.

त्याच्या मिड-स्पेक व्हेरियंटमध्ये 7-इंच टचस्क्रीन युनिट आहे, जे मागील मॉडेलमध्ये देखील होतं. SUV मधील इतर सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), हिल होल्ड असिस्ट, बॅक सीटवर असलेल्या मुलांसाठी ISOFIX रिअर अँकर आणि 360-डिग्री कॅमेरा (सेगमेंटमध्ये प्रथम) यांचा समावेश आहे.

टॉप व्हेरियंटमध्ये आता Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह नवीन 9.0-इंच स्मार्टप्ले प्रो+ टचस्क्रीन, Arkamys साउंड सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, रीअर एसी व्हेंट्स, व्हॉईस कमांड सपोर्ट, कनेक्टेड कार टेक, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल दिलं आहे. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अँम्बियंट लाइटिंग, यूएसबी टाइप-सी रिअर चार्जिंग पोर्ट, कनेक्टेड कार टेक, अलेक्सा कंपॅटिबिलिटी आणि सनरूफ यासारख्या फीचर्समुळे ही SUV आणखी चांगली बनते.