Take a fresh look at your lifestyle.

देशात Triton EV लॉन्च करणार पहिली Hydrogen Electric Scooter, 175 km पर्यंत असणार रेंज, काही दिवसातच सुरु होणार बुकिंग ; पहा डिटेल्स

शेतीशिवार टीम : 18 ऑगस्ट 2022 :- आत्तापर्यंत देशात फक्त पेट्रोलवर आणि बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच (EV) चालताना दिसतात, पण लवकरच तुम्हाला हायड्रोजन इलेक्ट्रिक स्कूटरनेही प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. देशातील टॉप इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता ट्रायटन EV ने आपल्या आगामी नवीन हायड्रोजन इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाइनचा खुलासा केला आहे. या महिन्याच्या अखेरीस स्कूटरचे बुकिंग सुरू केलं जाणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे.

Triton Electric Vehicle ने घोषणा केली की, ते या महिन्याच्या अखेरीस त्यांच्या हायड्रोजन इलेक्ट्रिक स्कूटर आणि थ्री- व्हीलर वाहनांसाठी बुकिंग सुरू करणार आहे. परंतु, इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांचे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सेफ्टी आणि किंमत इत्यादींबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. केंद्र सरकारही पारंपरिक इंधनाऐवजी (पेट्रोल-डिझेल) अन्य इंधन ऑप्शन वापरण्यावर भर देत आहे.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी नुकतेच हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन हायड्रोजनवर धावणारी देशातील पहिली कार टोयोटा मिराई (Toyota Mirai)घेऊन संसदेत पोहोचले होते.

इलेक्ट्रिकपेक्षा हायड्रोजन वाहनांत असं काय आहे वेगळं :-

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये, चार्जिंगसाठी ज्या प्रकारे वाहन चार्जरमध्ये प्लग केले जाते. तर हायड्रोजन – पॉवरवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने हायड्रोजन साठवण्यासाठी क्रायोजेनिक टॅंक वापरतात ज्याचा वापर हायड्रोजन इंजिन सेल्सला पॉवर देण्यासाठी केला जातो आणि सामान्यतः भरण्यासाठी फक्त 4-5 मिनिटे लागतात. यामुळे वेळेची बचत होते आणि हा हायड्रोजनवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicle) सर्वात मोठा USP आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रायटनची हायड्रोजनवर चालणारी इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 4 मिनिटांत रिफिल केली जाऊ शकते आणि ही स्कूटर 175 Km ची रेंज देते.

ट्रायटन इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे संस्थापक आणि एमडी हिमांशू पटेल यांनी सांगितलं की, आज आम्ही लॉन्च करत असलेल्या स्कूटरच्या डिझाइन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट नंतर भारतीय वाहतूक परिस्थितीनुसार डिझाइन केल्या आहेत. स्टाईल व्यतिरिक्त, आमच्या स्कूटर्सची रचना प्रवाशांच्या सेफ्टीसाठीकरण्यात आली आहे.

या डिझाईन्स अगदी लहान मुलांसाठीही सेफ आहेत. EV सेफ्टीबद्दल बोलताना ट्रायटन इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे संस्थापक आणि एमडी हिमांशू पटेल म्हणतात, आम्ही ट्रायटन ईव्ही येथे बेस्ट-इन-क्लास, सेफ आणि स्वच्छ जबरदस्त -इंधन वाहने तयार करण्याच्या दिशेने काम करत आहोत. जे सेफ्टीबरोबरच सुरक्षित वातावरणाचीही खात्री करतील.

ट्रायटन EV वर आम्ही काही उत्पादन आणण्यापूर्वी R&D मध्ये क्वालिटी टाइम घालवण्यावर विश्वास ठेवतो. आम्ही स्कूटर आणि थ्री – व्हीलर वाहनांसाठी हायड्रोजन इंधन निवडले आहे, कारण आम्हाला पर्यावरणाचे महत्त्व देखील समजले आहे.