Take a fresh look at your lifestyle.

आधी म्हैस अन् आता गाय, वंदे भारत ट्रेनची 2 दिवसांत 2 दा धडक, अशानं कधी वेग पकडणार स्वदेशी बुलेट ट्रेन ? पहा, रूट, वेग, टाइम टेबल…

वंदे भारत या स्वदेशी बुलेट ट्रेनचा सलग दुसऱ्या दिवशीही अपघात झाला आहे. गुजरातमध्ये शुक्रवारी सलग दुसऱ्यांदा गुरे ट्रेनला धडकल्याची घटना घडली आहे. ट्रेनच्या पुढील भागाचे पुन्हा किरकोळ नुकसान झालं असून भाग चेमटला आहे . गांधीनगरहून मुंबईला जात असताना कंझरी आणि आनंद स्टेशन दरम्यान हा अपघात झाला. एक दिवसापूर्वी मणिनगर स्थानकाजवळ म्हशींचा कळप रेल्वेला धडकला होता. दुरुस्तीनंतर ही गाडी आज पुन्हा रुळावर आणण्यात आली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुजरातमधील आनंद स्टेशनजवळ एका गायीची ट्रेनला धडक बसल्याने ट्रेनच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झालं आहे. आज दुपारी 3.48 वाजता मुंबईपासून 432 Km अंतरावर असलेल्या आनंदमध्ये ही घटना घडली. याला दुजोरा देताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले, की ट्रेनच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झालं असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

पशुपालक मालकांवर गुन्हा दाखल

गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी वंदे-भारत एक्सप्रेस ट्रेनने म्हशींच्या कळपाला धडक दिल्याप्रकरणी रेल्वे संरक्षण दलाने (RPF) या गुरांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईत म्हशींच्या कळपाला धडकल्यानंतर झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्यात आली आहे. या अपघातात चार म्हशींचा मृत्यू झाला.

पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ प्रवक्ते (Ahmedabad Division) जितेंद्र कुमार जयंत म्हणाले, “RPFने अहमदाबादमधील वाटवा आणि मणिनगर रेल्वे स्थानकांदरम्यान वंदे भारत ट्रेनच्या मार्गावर येणाऱ्या म्हशींच्या अज्ञात मालकांविरुद्ध FIR नोंदवला आहे.

काय आहे खास्सीयत :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 सप्टेंबर रोजी नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. देशातील ही तिसरी सेमी हायस्पीड ट्रेन आहे. गांधी नगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणार आहे. ही ट्रेन ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार करण्यात आली आहे. त्याचे बहुतांश भाग भारतातच बनवले गेले आहे.

न्यू सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन वेग, सुरक्षितता आणि सेवेच्या बाबतीत इतर ट्रेनपेक्षा वेगळी आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये अवघ्या 18 महिन्यांत त्याची निर्मिती करण्यात आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस जास्तीत जास्त 180Km प्रतितास वेगाने धावू शकते. ती काही सेकंदात 100 किमीचा वेग पकडू शकते.परंतु सध्या मात्र कमाल वेग ताशी 130 Km ठेवण्यात आला आहे. गांधी नगर ते मुंबई दरम्यान ट्रेन सुमारे साडेसहा तासांत हा अंतर कापते.

गांधीनगर – अहमदाबाद – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस मार्ग, वेळापत्रक :-

वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल येथून सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि दुपारी 12.30 वाजता गांधीनगरला पोहोचेल. ही ट्रेन सुरतला सकाळी 8:50 वाजता, वडोदराला 10:20 वाजता आणि अहमदाबादला 11:35 वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात वंदे भारत एक्सप्रेस गांधीनगर येथून दुपारी 2:05 वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलला रात्री 8:35 वाजता पोहोचेल. ती अहमदाबाद रेल्वे स्थानकात दुपारी 2:40 वाजता, वडोदरा येथे 4 वाजता आणि सुरत येथे 5:40 वाजता पोहोचेल.

सीट्स 180 डिग्री पर्यंत फिरतात :-

एक्झिक्युटिव्हमध्ये 180 डिग्री रेसिप्रोकेटिंग सीट्स आहेत. साइड रिक्लायनरचीही सोय आहे. ट्रेनमध्ये बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स असून टच फ्री सुविधा आहेत. प्रत्येक कोचमध्ये गरम अन्न आणि पेये देण्याची सुविधा असलेली पॅन्ट्री आहे. तसेच अँटोमॅटिक डोअर, GPS बेस्ड ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी इन्फो सिस्टीम, मनोरंजनासाठी ऑनबोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय दिलं आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एकूण 1,128 प्रवासी बसण्याची क्षमता आहे.