Upsc Tricky Interview Question : भारतात शून्य रुपयाची नोट कधी आणि का छापली गेली ?
शेतीशिवार टीम, 3 फेब्रुवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात रेल्वे लाईन नाही ?
उत्तर : मेघालय.
प्रश्न : जगातील सर्वात मोठं विमान कोणतं आहे ?
उत्तर : स्ट्रॅटोलॉंच (Stratolonch) हे जगातील सर्वात मोठं विमान आहे. ज्याचे वजन 2.26 लाख किलो आहे. या विमानाच्या विंग स्पॅनची लांबी 375 फूट आहे. संपूर्ण विमान दोन वेगवेगळ्या केबिनमध्ये विभागलेलं आहे.
प्रश्न : 1 कोटी जिंकलेल्या KBC विजेत्याला प्रत्यक्षात किती पैसे मिळतील ?
उत्तर : KBC मध्ये जर एखाद्याने 1 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकलं असेल तर 30% कर (income tax) भरावा लागेल. यानंतर, 30% करावर 10% अधिभार लावला जाईल, जो 30 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत 10% असेल. यानंतर 4% उपकर (Cess tax) लागू होईल, त्यानंतर 30 लाख रुपयांचे 4% 1 लाख 20 हजार रुपये झाले आहेत. म्हणजेच कर 30 लाख रुपये, अधिभार 3 लाख रुपये आणि उपकर (Cess tax) 1 लाख 20 हजार रुपये करण्यात आला आहे. ही रक्कम जोडून 34 लाख 20 हजार रु. याशिवाय एक-दोन छुपे शुल्कही (Hidden charges) आहेत. म्हणजेच केबीसीमध्ये जर एखाद्याने 1 कोटी रुपये जिंकले असतील तर त्याला फक्त 65 लाख रुपये मिळतील.
प्रश्न : भारतात शून्य रुपयाची नोट कधी आणि का छापली गेली ?
उत्तर : आरबीआयने कधीही शून्य रुपयांच्या नोटा छापल्या नाहीत. परंतु, 2007 मध्ये 5th pillar नावाच्या NGOने शून्य रुपयांच्या नोटा छापण्याचे काम सुरू केलं. ही NGO तामिळनाडूची आहे. ज्यांनी लाखो रुपयांच्या शून्य नोटा छापल्या. या नोटा हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम सारख्या इतर भाषांमध्येही छापण्यात आल्या होत्या.
NGO ने लाच घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून या नोटा छापल्या होत्या. NGO ने लाचखोरीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना त्यांचे हक्क आणि पर्यायी उपायांची आठवण करून देण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि बाजारपेठेत शून्य रुपयांच्या नोटा वितरित केल्या होत्या.
भ्रष्टाचाराच्या विरोधात बनवलेल्या या चिठ्ठीत अनेक संदेश लिहिले होते, त्यात ‘भ्रष्टाचार संपवा’, ‘कोणी लाच मागितली तर ही नोट द्या आणि प्रकरण आम्हाला सांगा’, ‘मी लाच घेणार नाही याची शपथ घेतो.’ असे अनेक संदेश लिहिले होते.
प्रश्न : असं काय आहे, जे वर्षातून एकदा अन् आठवड्यातून दोनदा येतं ?
उत्तर : ‘E’ letter
आठवड्याला इंग्रजीत ‘WEEK’ आणि वर्षाला ‘YEAR’ म्हणतात असं म्हणतात. या WEEK शब्दातील ‘EE’ हा शब्द दोनदा येतं, तर YEAR शब्दातील ‘E’ हा शब्द फक्त एकदाच येतं. अशा प्रकारे ‘E’ वर्षातून एकदा पण आठवड्यातून दोनदा येतं.
प्रश्न : असं कोणतं शहर आहे ज्यामध्ये हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या तिन्ही भाषांमधील शब्द येतात ?
उत्तर : अहमदाबाद (Ahemdabad) = अहम् (संस्कृत) + The (द) (English) + बाद (हिंदी)