Take a fresh look at your lifestyle.

EV Car : Washing मशीन एवढीचं Size ; सनरूफसारखे जबरदस्त फीचर्स, 140Km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज ; किंमत फक्त 2.50 लाख रु. पहा…

शेतीशिवार टीम : 2 ऑगस्ट 2022 :- जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे, आणि जागतिक बाजारपेठेत वेळोवेळी नवीन इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles) लॉन्च केली जात आहेत. आत्तापर्यंत आपण नेहमीच्या पॅसेंजर Car बद्दल जाणून घेतलं असून आज आपण अलीबाबाने EV-2022 मध्ये लॉन्च केलेली सर्वात लहान इलेक्ट्रिक कार बद्दल जाणून घेउया…

अलीबाबाने आतापर्यंत अनेक अनोखी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत आणि Electrek च्या रिपोर्टनुसार, ही जगातील सर्वात लहान पोलिस इलेक्ट्रिक कार आहे, जी आकाराने लहान तर आहे परंतु त्यात एकापेक्षा एक ॲडव्हान्स फीचर्सचा समावेश आहे. ही कार पाहून सायन्सफिक्शनमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्यूचरिस्टिक व्हीकल्सची आठवण होते.

Electrek च्या रिपोर्टनुसार, या पोलिस कारला 2.8 kW ची इलेक्ट्रिक मोटर आणि 60V 120Ah क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो 7.2 kWh ची पॉवर जनरेट करतो. असा दावा केला जात आहे की, ही कार एका चार्जमध्ये 140Km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते आणि ती दैनंदिन वापरासाठीही योग्य आहे. त्याची बॅटरी खूप कमी वेळात पूर्ण चार्ज होती अन् तेही कमीत कमी वीज वापरता…

या छोट्या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड 45Km प्रतितास आहे, जो सर्वसाधारणपणे कमी स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या बाबतीत खूपच वेगवान आहे. कारमध्ये दोन लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे, ज्यामध्ये ड्रायव्हर आणि को-ड्राइव्हर यांचा समावेश आहे. या कारचे एकूण वजन 580 किलो आहे.

किती आहे किंमत :-

अलीबाबाच्या अधिकृत वेबसाइटने या छोट्या इलेक्ट्रिक कारची किंमत $3,450 ते $5,000 दरम्यान निश्चित केली आहे, म्हणजे भारतीय रुपयानुसार 2.50 लाख ते 4 लाखांपर्यंत आहे. खरं तर कारची किंमत त्याच्या विक्रीच्या युनिट्सवर अवलंबून आहे. जर ग्राहकाने मोठ्या प्रमाणात अधिक युनिट्स खरेदी केले तर कारची किंमत कमी होईल.

इलेक्ट्रिक कारला सरकत्या खिडक्या, एक स्टिरिओ सिस्टीम, तसेच ॲडजस्टेबल सनरूफ देखील मिळतो. तुम्हाला चांगले वायु- वीजन हवे असल्यास, तुम्हाला फक्त सनरूफ उघडणे आवश्यक आहे.

सेफ्टीच्या दृष्टीने या कारमध्ये थ्री – पॉइंटेड सीट बेल्ट आणि डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. सध्या ही कार सध्या चीनच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून लवकरचं ही कार भारतीय मार्केटमध्ये उतरणार आहे.