अहिल्यानगर, नाशिक जिल्हा शेततळ्यांमध्ये अव्वल! मिळतंय दीड लाखांपर्यंत अनुदान, पहा चार्ट अन् ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

0

शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील 1328 शेतकऱ्यांना हक्काचे शेततळे मिळाले आहे. जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला..

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत राज्यात गतवर्षी वैयक्तिक 13 हजार 500 शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. मात्र, या उद्दिष्टापेक्षा अधिक 14 हजार शेततळी तयार झाली आहेत. अहमदनगर जिल्हा यामध्ये अव्वल आहे. त्यापाठोपाठ नाशिक, सोलापूर, सांगली जिल्हा शेततळी करण्यात आघाडीवर आहे. शेततळी करण्यासाठी आघाडीवर आहे. शेततळी करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे उद्दिष्ट 1475 इतके होते, त्यापैकी 1328 शेततळी पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील 60 मंडलांमध्ये दुष्काळी परिस्थिती होती. या काळात शेतकऱ्यांना शेततळ्यांचा आधार मिळाला.

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेची घोषणा राज्य सरकारने मागील अर्थसंकल्पात केली. शेतकरी, कृषी क्षेत्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या योगदानाचे स्मरण म्हणून शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशे वर्ष पूर्तीनिमित्त या योजनेला शिवरायांचे नाव देण्यात आले. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग, शेततळ्याचे अस्तरीकरण, पेरणी आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना या माध्यमातून शेततळे घेऊन पाण्याची गरज भागवता येणार आहे. ही संकल्पना वेगाने अंमलात आणली जात आहे..

शेततळ्यासाठी 0.40 हेक्टर क्षेत्र आवश्यक..

मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान 0.40 हेक्टर शेतीक्षेत्र असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग असावी.

शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरीता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

या योजनेंतर्गत शेततळ्यासाठी खोदकामासाठी 75 हजार रुपये अनुदान आहे तर अस्तरीकरणासाठीही 75 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.

योजनेचा लाभ घ्या.. 

शेततळ्याचा शेतकऱ्यांना चांगला लाभ होत आहे. जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये जास्तीत जास्त शेततळी केली आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा. सांगली जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. योजनेच्या माहितीसाठी गावस्तरावर कृषी सहाय्यक, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

– विवेक कुंभार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

अर्ज कसा कराल ?

1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.

2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर ऑप्शनमध्ये अर्ज करा’ यावर क्लिक करा.

3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 बाबी पर्यंत बाबी निवडायच्या आहेत ‘सिंचन साधने व सुविधा’ समोर ‘बाबी निवडा’ ऑप्शनवर क्लिक करा.

4) यानंतर तुम्हाला success दाखवलं जाईल यावर तुम्ही OK वर क्लिक करा.

5) यानंतर तुम्हाला सिंचन स्रोत निवडावा लागेल, यामध्ये तुमच्याकडे कोणतं सिंचन स्रोत आहे ते निवडा, जसे की, उपसा सिंचन / कूपनलिका / कालवा / शेततळे / विहीर / शेततळे / यापैकी तुम्ही सिंचन स्रोत निवडा…

6) यानंतर तुम्हाला ऊर्जा स्रोत निवडावा लागेल. जसे की, वीज कनेक्शन / सौर ऊर्जा चलित पपं / डिझेल चलित पपं यापैकी ऊर्जा स्रोत निवडा.

7) यानंतर तुम्हाला ‘सिंचन सुविधा व उपकरणे’ जसे की, इंजिन / इलेक्ट्रिक मोटार -सिंचन पपं / उपसा सिंचन / ठिबक / तुषार / यापैकी एक बाब निवडा.

8) यानंतर तुम्ही वापरात असलेलं उपकरण किती HP चं आहे ते निवडून त्याची संख्या लिहा..

9) यानंतर तुम्हाला ही बाब successfully ऍड झालेली दिसेल.

10) यानंतर तुम्हाला पुन्हा मुख्यपृष्ठावर जावं लागेल. मुख्यपृष्ठावर जणू पुन्हा अर्ज करा वर क्लिक करा. ‘सिंचन साधने व सुविधा’ या ‘बाबी निवडा’ ऑप्शनवर क्लिक करा.

11) यावर क्लिक केल्यानंतर आता पुन्हा अर्ज खुलेल.

12) यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल. यात वैयक्तिक तपशील आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी जसे की, तालुका, गट/ सर्व्हे नंबर मुख्य घटक तपशील मध्ये ‘सिंचन साधने व सुविधा‘ निवडा, यानंतर बाब निवडामध्ये ‘वैयक्तिक शेततळे’ यावर क्लिक करा. त्यानंतर उपघटक मध्ये तुम्हाला
तुम्हाला कोणता प्रकार हवाय तो निवडा. यानंतर ‘साईझ निवडा’ 30X30X3 / 15X15X3 / 20X15X3 यापैकी एक ऑप्शन निवड आणि बाब जतन करा.

13) जतन केल्यानंतर तुम्हाला success झालं म्हणून एक नोटिफिकेशन दिसेल.

14) त्यानंतर तुम्हाला पुन्हा मुख्यपृष्ठ दाखवलं जाईल. आता पुन्हा तुम्हाला उजव्या साईडला ‘अर्ज सादर करा’ ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्या ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल ते ok वर क्लिक करावे लागेल. एकदा ok वर क्लिक केल्यानंतर दुसरी बाब ऍड करू शकत नाही, बदल करायचा असेल तर पूर्ण अर्ज रद्द करावा लागतो. त्यामुळे काळजीपूर्वक सर्व करा.

15) यानंतर तुम्हाला ‘पहा’ या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्ही ज्या योजनांसाठी अर्ज केला असेल ते सांगळे अर्ज दिसेल त्याला प्राधान्य क्रम द्या.आणि ‘अर्ज सादर करा’ वर क्लिक करा.

16) क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपण 23.60 रुपयांचं payment करू शकता.

17) payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता…

अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल…

शेतकरी बांधवानो आपण शेतीशिवार च्या माध्यमातून ज्या काही लेटेस्ट योजनांचे अपडेट जाणून घेत आहोत या सर्व योजना खऱ्या आहेत. प्रत्येक योजनेच्या मुळापर्यंत तुम्हाला पोहचता आलं तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल वरून फॉर्म भरण्यास काही अडचण येत असेल तर आपली ‘शेतीशिवार’ ची बातमी आणि तुमचे कागदपत्रे घेऊन जवळच्या जनसेवा केंद्र ( सेतू ) ला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट करू शकता…

Leave A Reply

Your email address will not be published.