Maha DBT : आता ट्रॅक्टरसाठी तब्बल 5 लाखांचे अनुदान! पॉवर टिलर- कडबा कुट्टीसह ‘या’ यंत्रांच्या अनुदानात मोठी वाढ, पहा अर्ज लिंक..
कृषी यांत्रिकीकरण उप – अभियान योजनेअंतर्गत कृषी – संबंधित क्षेत्रांना अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणि कृषी उपकरणांना प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अधिकाधिक अत्याधुनिक कृषी यंत्रांचा वापर करता यावा यासाठी केंद्र सरकार अनेक प्रकारच्या सरकारी योजना राबवत आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या उपअभियानाचाही समावेश आहे.
या योजनेंतर्गत केंद्र – राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रे व उपकरणांवर 50 ते 80 टक्के अनुदान दिले जात होते. परंतु आता या योजनेत मोठा बदल केला असून अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर – पॉवर टिलर – कम्बाईन हार्वेस्टर या यंत्रात मोठी तिप्पटीने वाढ केली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कृषी उपकरणे खरेदी करताना आता ट्रॅक्टरसाठी तब्बल 5 लाखांचे अनुदान मिळणार आहे. तर पॉवर टिलर साठी 1 लाख 20 हजारांचे तर हार्वेस्टरसाठी 8 लाखांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
आता शेतकरी कृषी उपकरणे खरेदी करून पीक उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा वापर करू शकतात. केंद्राच्या या योजनेचा लाभ घेऊन देशातील लाखो शेतकऱ्यांनी आपली शेती आधुनिक केली आहे. या योजनेशी संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊया ..
किती मिळणार अनुदान :-
ट्रॅक्टर, पॉवर टिलर, हार्वेस्टर, नांगर पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर, चापकटर यांसारख्या कृषी यंत्रांवर सामान्य श्रेणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत जास्तीत जास्त अनुदान मिळेल. त्याच वेळी, SC/ST / अत्यंत मागासवर्गीयांना जास्तीत जास्त 50% अनुदान मिळेल..
टॅक्टरसाठी 4WD (40 PTO एचपी किंवा अधिक) जनरल प्रवर्गासाठी 4 लाख रुपये अनुदान दिलं जाणार असून तर, SC/ ST प्रवर्गासाठी 5 लाखांचे अनुदान दिलं जाणार आहे. या आधी या अनुदानाची मर्यादा 1 लाख 25 हजारांपर्यंत होती.
कोणत्या कृषी यंत्रणा किती अनुदान हा चार्ट पहा..
संपूर्ण चार्ट (PDF) डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा
अर्ज कुठे आणि कसा कराल ?
1) या योजनेसाठी तुम्हाला https://mahadbt.maharashtra.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे, (तो तुम्ही CSC सेंटरवरही जाऊन करून शकता)
2) होमपेजवर पोहोचल्यानंतर, नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करा..
3) नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ‘अर्ज करा’ यावर क्लिक करा.
4) यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 बाबी दिसतील, यामध्ये ‘कृषीयांत्रिकीकरण’ या ऑप्शनवर क्लिक करा.
5) यानंतर तुमची पर्सनल डिटेल्स भरा जसे की, गाव, तालुका, मुख्य घटकमध्ये ‘कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य’ इत्यादी..
6) तपशील मध्ये ‘ट्रॅक्टर’ निवडा, एच पी श्रेणी मध्ये 20HP ते 35HP पर्यंत निवडा यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकारामध्ये 2 डब्ल्यू डी / 4 डब्ल्यू डी कोणतीही 1 बाब निवडा. त्यानंतर ‘जतन करा’ वर क्लिक करा. तुमची बाब SUCCESS होईल..
पीक फवारणी यंत्र योजना : 2022 | पीक फवारणी यंत्रावर मिळवा 3000 ते 1 लाख 25000 पर्यंत अनुदान