शेतकरी पुत्रांनो, कडबा कुट्टी मशीनसाठी मिळवा 75% अनुदान । पहा, पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस…

0

राज्य सरकारने शेतीशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. परंतु माहितीअभावी शेतीतील मोठा वर्ग त्यांचा लाभ घेण्यापासून आजही वंचित आहे. पशुसंवर्धनात गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी अशी योजना तर अतिशय महत्त्वाची आहे. जी आपण या लेखात आज जाणून घेणार आहोत. 

मित्रांनो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत महा DBT पोर्टलवरून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी साठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ? यासाठी किती अनुदान दिलं जातं ? कागदपत्रे ? लाभ, ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…

पशुपालकांना चारा कापण्याचे यंत्र खरेदी म्हणजे कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी शासनाकडून अनुदान दिलं जातं…

कडबा कुट्टी मशीन साठी किती मिळेल अनुदान…

पंचायत समितीच्या माध्यमातून व राष्ट्रीय पशुधन विकास योजनेअंतर्गत महा DBT पोर्टलवरून, 3 प्रकारच्या कडबा कुट्टी मशीनसाठी 50% ते 75% पर्यंत अनुदान दिलं जातं. यामध्ये 3 HP पेक्षा कमी क्षमतेच्या कडबा कुट्टी, 3 HP पेक्षा जास्त क्षमतेच्या कडबाकुट्टी आणि ट्रॅक्टर चलित कडबा कुट्टी यंत्र. जर कडबा कुट्टी मशीनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर 10 हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात येतं. त्यामुळे यंत्राचे जेवढी किंमत असेल त्याच्या 50% ते 75% अनुदान मिळतं. तसेच 50% ते 75% हे अनुदान शेतकऱ्यांच्या वर्गवारीनुसार केलं जातं. त्यामध्ये Open category साठी 50% व SC / OBC / VJ / NT / SBC / ST साठी 75% हे अनुदान मिळतं.

कोण घेऊ शकतो लाभ :-

राज्यातील शेतकरी mahadbt farmer scheme अनुदान 2022 योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी अर्ज करू शकतात. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे. ही योजना देखील त्याच मोहिमेचा एक भाग असून, या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या श्रेणीनुसार नवीन कडबा कुट्टी मशीन खरेदीवर शेतकऱ्यांना तब्बल 50% ते 75% अनुदान दिलं जातं. अन् यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीची कडबा कुट्टी मशीन खरेदी करू शकतात अन् तेही निम्म्या किमतीत…

पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे :-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असावी.
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट साइज फोटो
ओळख पुरावा (आधार कार्ड) इत्यादी..

ऑनलाईन अर्ज कसा कराल ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ‘एक शेतकरी एक योजना’ म्हणजे नवं पोर्टलhttps://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टल वर तुम्ही आपला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा किंवा आपला आधार कार्ड ओटीपी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता…

लॉगिन केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला तुमचं प्रोफाइल हे 100% दाखवणं गरजेचं आहे.

यानंतर तुम्हाला ‘अर्ज करा’ वर क्लिक करायचे आहे. अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो आणि एक शेतकरी एक अर्ज अंतर्गत आपल्याला सर्व बाबीचा अर्ज एकाच पोर्टल वरती करता येतो.

याचा आपल्याला ‘कृषी यांत्रिकीकरण’ ही बाब निवडा या अंतर्गतच आपल्याला अर्ज करायचा आहे.

‘कृषी यांत्रिकीकरण’ या ऑप्शनवर क्लिक केल्यांनतर अर्ज तुमच्या समोर उघडेल.

अर्ज उघडल्यानंतर तुम्ही तुमचा ‘तालुका’ निवडा’

यानंतर तुम्हाला ‘मुख्य घटक’ हा ऑप्शन दिसेल, यामध्ये ”कृषी यांत्रिकीकरण खरेदीसाठी अर्थसाहाय्य” या वर क्लिक करायचं आहे.

या नंतर ‘तपशील निवड’ हा ऑप्शनवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसेल त्यातील ‘मनुष्यचलित अवजारे’ या वर क्लिक करायचं आहे.

या नंतर तुम्हाला यंत्रसामग्री / अवजारे / उपकरणे हा एक ऑप्शन दिसेल. त्यावर निवड करा वर क्लिक करून ”फॉरेस ग्रास अँड स्ट्रॉ रेस्युड मॅनेजमेंट कटर स्लेडर” ही बाब निवडा.

या नंतर तुम्ही मशीनचा प्रकार या यावर क्लिक करून तुम्हाला 3 HP मशीन घ्यायची का 3 HP पेक्षा जास्त तर तुम्ही ”चाफ कटर 3 HP” या ऑप्शनवर क्लिक करा.

या वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ”जतन करा” यावर क्लिक करा…

अर्ज जतन करल्यानंतर तुम्हाला घटक तपशील यशस्वीरीत्या जोडला आहे. अजून घटक जोडायचा आहे का ? तर तुम्हाला ‘NO’ म्हणायचं आहे. यानंतर पेमेंट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर 23.60 रु. पेमेंट करावं लागेल.

प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर ‘WINER’ हा मॅसेज प्राप्त होईल या नंतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील अन् तुम्हाला तुमच्या बँक खात्यात अनुदान जमा होईल.

आपल्या शेतकरी, उद्योजक बांधवांसाठी :-

शेतकरी बांधवानो आपण शेतीशिवार च्या माध्यमातून ज्या काही लेटेस्ट योजनांचे अपडेट जाणून घेत आहोत या सर्व योजना खऱ्या आहेत. प्रत्येक योजनेच्या मुळापर्यंत तुम्हाला पोहचता आलं तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल वरून फॉर्म भरण्यास काही अडचण येत असेल तर आपली शेतीशिवारच्या योजनेच्या बातमीची लिंक आणि तुमचे कागदपत्रे घेऊन जवळच्या जनसेवा केंद्र ( सेतू ) ला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन सबमिट करू शकता…

धन्यवाद… 🙏

Leave A Reply

Your email address will not be published.